IMPIMP

Pune Revenue Department | महसूल वसुलीत पुणे अव्वलस्थानी; तब्बल 750 कोटींचा महसूल जमा

by nagesh
Pune Revenue Department | Pune tops in revenue collection 750 crore revenue collection Collector Dr Rajesh Deshmukh

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Revenue Department | पुणे जिल्हा महसूल विभागाकडून (Pune Revenue Department) आतापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक अर्थात सुमारे 750 कोटी रुपयांचा महसूल वसुल करण्यात आला आहे. यामुळे विभागात पुणे जिल्हा महसूल वसुलीस टाॅप ठरला आहे. मागील दोन वर्षापासून कोरोनाचं संकट असुनही प्रारंभीपासून महसूल वसुलीवर दिलेले लक्ष, आता पर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या घटकांवर लक्ष देऊन केलेली जाणीवपूर्वक वसुली, महसूल वसुलीसाठी शोधलेले नवे पर्याय पुण्याचे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांच्या नेतृत्वाखालील शोधण्यात आल्याने रेकॉर्ड ब्रेक झाला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

प्रतिवर्षी सर्व विभागांना राज्य सरकारने (Maharashtra State Government) ठरवून दिलेल्या उद्दिष्टानुसार गेल्या 3 वर्षाच्या तुलनेमध्ये महसूल वसुली मध्ये प्रशासनाने आघाडी घेतलीय.
2019 – 20 साली 572 कोटी, 2020 – 21 मध्ये 577 कोटी, 2021 – 22 मध्ये तब्बल 750 कोटी रुपयांचा महसूल टप्पा जिल्हा प्रशासनाकडून पार करण्यात आला आहे.
यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे प्रशासनाला टप्पा पार करणे अवघड झाले होते.
पण, योग्य नियोजनाने प्रशासनाने आपले कर्तव्य पार केले आहे. (Pune Revenue Department)

 

निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे (Himmat Kharade) म्हणाले, ”308 कोटी रुपयांचा जमीन महसूल गोळा करण्यात आला असून 210 कोटी रुपयांचा गौणखनिज कर वसूल करण्यात आलेला आहे.
याच बरोबर 231 कोटी रुपयांचा शिक्षण कर व रोजगार हमी कर वसूल करण्यात आलेला आहे.
असा तब्बल 750 कोटी रुपयांचा महसूल प्रशासनाने गोळा केलेला आहे.
प्रत्येक तालुक्यातील थकित जमीन महसूल गौणखनिज महालेखाकार अंतर्गत लेखा परिक्षण व अन्य तत्सम महसुली नजराना प्रकरणांमध्ये दहा लाखांपेक्षा जास्त असलेल्या मोठ्या वसुली प्रकरणांची यादी करुन त्यामध्ये पाठपुरावा करण्यात आला.
सदरच्या रक्कमा गोळा करण्यासाठी नियोजन करण्यात आले होते.”

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

”यंदाच्या वर्षी कोरोनाचे तीव्र संकट होते. त्यामुळे महसूल गोळा करताना काही अडचणींचा सामना करावा लागला.
पण, पहिल्यापासून योग्य नियोजन केल्याने 750 कोटींचा टप्पा पार करता आला.
अप्पर जिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी यांना वेळोवेळी सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार आणि शाखाधिकारी यांच्या बैठका घेवून वसुलीच्या अनुषंगाने सूचना केलेल्या होत्या. हे सर्व टीमचे यश आहे.”

– डॉ. राजेश देशमुख (जिल्हाधिकारी, पुणे)

 

Web Title :- Pune Revenue Department | Pune tops in revenue collection 750 crore revenue collection Collector Dr Rajesh Deshmukh

 

हे देखील वाचा :

Punit Balan Group | तिसरी ‘एस. बालन T-20 लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! एमईएस इलेव्हन, गेम चेंजर्स इलेव्हन संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत !

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार औरंगाबाद कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 63 जणांवर कारवाई

Dental Care | दाताच्या वेदनांनी असाल त्रस्त तर ‘हे’ 5 आयुर्वेदिक उपाय अवलंबा, जाणून घ्या सविस्तर

 

Related Posts