IMPIMP

Punit Balan Group | तिसरी ‘एस. बालन T-20 लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! एमईएस इलेव्हन, गेम चेंजर्स इलेव्हन संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत !

by nagesh
Punit Balan Group | The third ‘s. Balan T-20 League Championship Cricket Tournament! MES XI, Game Changers XI teams fight for the title!

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) तर्फे आयोजित तिसर्‍या ‘एस. बालन टी-२० लीग’ अजिंक्यपद आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत एमईएस इलेव्हन संघ आणि गेम चेंजर्स इलेव्हन या दोन संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत होणार आहे. (Punit Balan Group)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत शुभम मेद याच्या गोलंदाजीच्या जोरावर गेमचेंजर्स इलेव्हन संघाने केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाचा ७ गडी राखून स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमीने पहिल्यांदा फलंदाजी करताना मंदार भंडारी (२५ धावा), रोहीत करंजकर (२४ धावा) आणि दिग्विजय जाधव (२० धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर १८.४ षटकात १०७ धावा धावफलकावर लावल्या. गेमचेंजर्स संघाच्या दिव्यांग हिंगणेकर (३-३१) आणि शुभम मेद (३-२३) यांनी अचूक गोलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघाच्या धावसंख्येला मर्यादा आणल्या. हे आव्हान गेमचेंजर्स इलेव्हन संघाने ११.५ षटकात व ३ गडी गमावून पूर्ण केले. दिव्यांग हिंगणेकर (नाबाद २६), रोहन दामले (नाबाद २६) आणि तुशार श्रीवास्तव (२० धावा) यांनी संघाचा विजय सोपा केला. (Punit Balan Group)

 

 

दुसर्‍या उपांत्य फेरीच्या सामन्यात हरी सावंत याच्या कामगिरीमुळे एमईएस इलेव्हन संघाने आयोजक पुनित बालन ग्रुप संघाचा केवळ ३ धावांनी पराभव करून स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. एमईएस इलेव्हन संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १७५ धावांचे आव्हान उभे केले. अजित गव्हाणे (५१ धावा), रोहीत हाडके (४० धावा) आणि जय पांडे (२७ धावा) यांनी संघाला पावणे दोनशे धावांचा टप्पा गाठून दिला. या धावसंख्येचा पाठलाग करताना पुनित बालन ग्रुपने सावधानकारक सुरूवात केली. परंतु मोक्याच्या क्षणी त्यांचे फलंदाजी बाद होत गेले व सामना त्यांच्या हातून निसटला. सिध्दार्थ मराठे (६९ धावा), मेहूल पटेल (३७ धावा) आणि ऋतुराज वीरकर (२८ धावा) यांनी उपयुक्त फलंदाजी केली. परंतु संघाचा विजय केवळ ३ धावांनी दूर राहीला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सामन्याचा संक्षिप्त धावफलकः उपांत्य फेरीः

१) केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १८.४ षटकात १० गडी बाद १०७ धावा (मंदार भंडारी २५, रोहीत करंजकर २४, दिग्विजय जाधव २०, दिव्यांग हिंगणेकर ३-३१, शुभम मेद ३-२३) पराभूत वि. गेमचेंजर्स इलेव्हनः ११.५ षटकात ३ गडी बाद १०९ धावा (दिव्यांग हिंगणेकर नाबाद २६, रोहन दामले नाबाद २६, तुशार श्रीवास्तव २०, प्रितम पाटील ३-३०); सामनावीरः शुभम मेद;

२) एमईएस इलेव्हनः २० षटकात ८ गडी बाद १७५ धावा (अजित गव्हाणे ५१ (४०, ३ चौकार, २ षटकार), रोहीत हाडके ४०, जय पांडे २७, सागर सावंत २-३९, अक्षय दरेकर १-३२) वि.वि. पुनित बालन ग्रुपः २० षटकात ८ गडी बाद १७२ धावा (सिध्दार्थ मराठे ६९ (४७, ५ चौकार, १ षटकार), मेहूल पटेल ३७, ऋतुराज वीरकर २८, हरी सावंत २-२९, रोहीत हाडके १-९); सामनावीरः हरी सावंत;

 

 

Web Title :- Punit Balan Group | The third ‘s. Balan T-20 League Championship Cricket Tournament! MES XI, Game Changers XI teams fight for the title!

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार औरंगाबाद कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 63 जणांवर कारवाई

Dental Care | दाताच्या वेदनांनी असाल त्रस्त तर ‘हे’ 5 आयुर्वेदिक उपाय अवलंबा, जाणून घ्या सविस्तर

Anil Deshmukh In JJ Hospital Mumbai | अनिल देशमुखांची प्रकृती बिघडली, तुरूंगातून जे. जे. रूग्णालयात; लवकरच शस्त्रक्रिया होणार

Congress Member in Rajya Sabha | काँग्रेसची अवस्था आणखी बिकट ! राज्यसभेतील सदस्य संख्याही होणार कमी

 

Related Posts