IMPIMP

Pune River Development Project | मुळा- मुठा नदीकाठ सुधार योजनेवर शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक ! पर्यावरण प्रेमींना प्रकल्पाचे सादरीकरण करून त्यांच्या सूचनांचाही अभ्यास करावा – जलसंपदा मंत्र्यांचे पालिका प्रशासनाला आदेश

by nagesh
Pune PMC News | Such a result of the change of power in the state Political pressure on Municipal Corporation to get Rs 12 crore for cable duct work Finally the Municipal Corporation floated tenders to earn income by paying the dues

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune River Development Project | बहुचर्चित मुळा- मुठा नदीकाठ सुधार योजनेवर आज मुंबईमध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीमध्ये पुण्यातील पर्यावरण प्रेमी संस्थांच्या प्रतिनिधींची या प्रकल्पाबाबतची मते जाणून घेण्यात आली. १६ मार्चला पुण्यातील सिंचन भवन येथे पर्यावरण प्रेमी संस्थांच्या प्रतिनिधींना सविस्तर सादरीकरण त्यांचे प्रश्‍न व सूचना ऐकून घ्याव्यात, असे आदेश जलसंपदा मंत्र्यांनी महापालिकेच्या अधिकार्‍यांना केली. (Pune River Development Project)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मुळा- मुठा नदीकाठ सुधार योजनेचे उदघाटन नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते झाले आहे. महापालिकेमध्ये सर्व पक्षांनी या प्रकल्पाला पाठींबा दिला असला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखिल पर्यावरण प्रेमी संघटनांनी या प्रकल्पाबाबत आक्षेप उपस्थितीत केल्याचे जाहीरपणे सांगितले होते. शरद पवार यांनी तर यासंदर्भात लवकरच बैठक बोलावू असेही नमूद केले होते. त्यानुसारच आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुंबईत या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे, जलसंपदा, पर्यावरण खात्याचे सचिव, खासदार वंदना चव्हाण (MP Vandana Chavan), पुण्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar), पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील (PCMC Commissioner Rajesh Patil), पुणे महापालिकेचे नगरअभियंता प्रशांत वाघमारे (PMC City Engineer Prashant Waghmare), पर्यावरण प्रेमी सारंग यादवाडकर (Environmentalist Sarang Yadavkar) आदी उपस्थित होते. (Pune River Development Project)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

या बैठकीमध्ये सारंग यादवाडकर यांनी तसेच नदी बंदीस्त केल्याने पूराचा संभाव्य धोक्यासोबतच पर्यावरणाच्या दृष्टीने विविध शंका उपस्थित केल्या. यावर महापालिकेच्यावतीनेही सीडब्ल्यूपीआरएस या राष्ट्रीय जल अभ्यास संस्था, पर्यावरण विभाग तसेच संबधित विभागांच्या समन्वयातून प्रकल्पाचा आराखडा तयार केल्याचे बैठकीमध्ये निदर्शनास आणून दिले. ११ टप्प्यांमध्ये करण्यात येणार्‍या या प्रकल्पासाठी अगदी पिंपरी चिंचवडमधून वाहत येणार्‍या पवना तसेच मुळा नदीकाठाचाही विचार करण्यात आला असून पिंपरी चिंचवड महापालिका देखिल या प्रकल्पात सहभागी होणार असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच पर्यावरणाच्या बाबतीत काही बाबी एनजीटीच्याही (हरित लवाद) निदर्शनास आणून दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यानंतर जलसंपदा मंत्र्यांनी १६ मार्चला पुण्यातील सिंचन भवन येथे बैठक घेउन पर्यावरण प्रेमींना प्रकल्पाचे सादरीकरण करावे, तसेच त्यांच्या सूचनां जाणून घ्याव्यात. प्रकल्प विनाअडथळा आणि अधिक चांगला कसा होईल याबाबत सर्वतोपरी दक्षता घ्यावी, अशी सूचना महापालिका प्रशासनाला केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

संगमवाडी ते बंडगार्डन या पहिल्या टप्प्याच्या कामाची वर्क ऑर्डर बी.जी. शिर्के या कंपनीला देण्यात आली आहे.
तर बंडगार्डन ते मुंढवा या दुसर्‍या टप्प्याच्या कामाची वर्क ऑर्डर जे.कुमार इन्फ्रा. या कंपनीला देण्यात आली आहे.
या वर्क ऑर्डर दिल्यानंतर ६ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले आहे.

Web Title :- Pune River Development Project | Meeting in Mumbai in the presence of Sharad Pawar on Mula-Mutha river bank improvement scheme! Environmentalists should study the project and present their suggestions – Water Resources Minister orders municipal administration

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांकडून आणखी एक गौप्यस्फोट; ठाकरे सरकारच्या अडचणी वाढणार ?

Pune Cyber Crime | कोट्यावधी रूपयांच्या क्रिप्टो करन्सीची फसवणूक ! पुणे सायबर पोलिसांकडून सायबर तज्ञ पंकज घोडे आणि रविंद्रनाथ पाटील याला अटक; मोबाईल, लॅपटॉप, मॅकबुक, सिडी, पेन्ड्राईव्हसह अनेक महत्वाच्या गॅझेट्स जप्त

Daily Habits Harm Yours Kidneys | ‘या’ 10 सवयी तुमची किडनी करतील खराब, आजपासूनच सोडून द्या; जाणून घ्या

Related Posts