IMPIMP

Pune RTO | पुणे RTO कडून दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

by nagesh
 Pune RTO | Call for tarpaulin covering while transporting minor mineral

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय Pune Regional Transport Office (Pune RTO) येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी (Two Wheeler) नवीन मालिका (New Series) सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून खासगी चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांकाबाबत दुचाकींसाठी आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू (Pune RTO) करण्यात आली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित तीनपट शुल्क भरून हवे असतील अशा चारचाकी वाहन (Four Wheeler) मालकांनी 5 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज असल्यास त्याची यादी 8 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याच दिवशी दुपारी 4.30 वाजता सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (Pune RTO), नवीन वाहन नोंदणी विभाग (New Vehicle Registration Department) यांच्या कक्षात लिलाव करण्यात येईल.

 

दुचाकी वाहन मालकांनी आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असल्यास 8 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज असल्यास त्याची यादी 10 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याच दिवशी दुपारी 4 वाजता सहकार सभागृहामध्ये लिलाव करण्यात येईल.

 

अर्ज कार्यालयाच्या खाजगी वाहन नोंदणी विभागात धनाकर्ष (डीडी), पत्त्याचा पुरावा, आधार कार्ड, ओळखपत्र,
पॅनकार्डच्या (Aadhaar Card, Identity Card, PAN Card) साक्षांकित प्रतीसह आधारकार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकासह जमा करावा. हा डीडी ‘आर.टी.ओ., पुणे’यांच्या नावे राष्ट्रीयकृत, अनूसचित बँकेचा पुणे येथील असावा. अर्जासह पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डच्या स्वाक्षांकित प्रतीसह जमा करावा.

 

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही.
नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही
तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व शुल्क सरकारजमा होईल.
कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क परत करता
येणार नसल्याचेउप प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पणे यांनी कळविले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune RTO | New series of registration number for two wheelers

 

हे देखील वाचा :

Rain in Maharashtra | राज्यात पुढील 48 तासात मान्सुन पुन्हा सक्रिय होणार, ‘या’ भागात अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा

Osmanabad ACB Trap | अटक न करण्यासाठी 20 हजाराची लाच घेताना पोलीस एसीबीच्या ताब्यात

Shivsena MP Sanjay Raut | राऊतांच्या घरात सापडली डायरी, कोट्यावधींचा हिशोब कोडिंगमध्ये, राऊतांच्या अडचणीत वाढ?

 

Related Posts