IMPIMP

Pune Shivaji Nagar Crime | बाथरुममध्ये कपडे बदलत असताना चोरून व्हिडिओ काढून विनयभंग, शिवाजीनगर भागातील घटना

by sachinsitapure
Molestation Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Shivaji Nagar Crime | अंघोळ केल्यानंतर कपडे बदलत असताना तरुणीचे मोबाईलमध्ये चोरुन चित्रीकरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी (Shivaji Nagar Police Station) अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे (Molestation Case). हा प्रकार गुरुवारी (दि.29 फेब्रुवारी) सकाळी सव्वा सहा ते पावणे सातच्या दरम्यान महिलेच्या घरात घडला आहे.

याबाबत 28 वर्षीय तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अज्ञात आरोपीविरोधात आयपीसी 354 (क) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी बाथरुमध्ये कपडे बदलत असताना त्यांना बाथरूम मध्ये मोबाईल ठेवल्यासारखे वाटले. मोबाईलमध्ये कपडे बदलतानाचे चित्रिकरण करुन मोबाईल घेऊन पळून जातानाचा आवाज तरुणीला आला. आरोपीने तरुणीचा व्हिडिओ अगर फोटो काढून विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

नाष्टा करण्यासाठी गेलेल्या तरुणीचा विनयभंग

आंबेगाव : मैत्रिणी सोबत हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी गेलेल्या तरुणीला शिवीगाळ करुन धमकी दिली.
तसेच तरुणीच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन विनयभंग केला.
हा प्रकार बुधवारी (दि.28) रात्री दहाच्या सुमारास आंबेगाव बुद्रुक परिसरातील मुंबई-सातारा हायवेवरील
(Mumbai Satara Highway) हॉटेल वाय.डी. कॅफे येथे घडला आहे.

याबाबत वारजे माळवाडी येथे राहणाऱ्या 30 वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात
(Bharti Vidyapeeth Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन मंगेश बाळकृष्ण देवकर
(Mangesh Balkrishna Deokar), महेश शिवाजी देवकर (Mahesh Shivaji Deokar) यांच्यावर आयपीसी 354अ, 352,
504, 506, 509, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी व त्यांच्या मैत्रिणी वाय.डी. कॅफे येथे नाष्टा करण्यासाठी
गेल्या होत्या. त्यावेळी आरोपींनी गैरवर्तन करुन त्यांना शिवीगाळ केली. तसेच धमकी दिली.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts