IMPIMP

Pune Solar Energy Projects | ऊर्जा निर्मितीमध्ये पुणेकरांचे ‘सौर’ उड्डाण 254 मेगावॅटवर

घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे दहा हजारांवर सौर ऊर्जा प्रकल्प

by nagesh
Pune Solar Energy Projects | Mahavitaran Punekar’s ‘solar’ flight in energy generation at 254 MW; Ten thousand solar power projects for domestic, commercial and industrial customers

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Solar Energy Projects | महावितरणकडून (Pune Mahavitaran) छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांना वेग देण्यात आला असून पुणे परिमंडलात चांगल्या प्रतिसादामुळे तब्बल २५३.९४ मेगावॅट क्षमतेचे १० हजार १७० सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक वैयक्तिक व सोसायटीच्या घरगुती ७ हजार ५८० ग्राहकांकडील ७२ मेगावॅटच्या सौर प्रकल्पांचा समावेश आहे. तर ९६.७९ मेगावॅट क्षमतेचे आणखी ३ हजार ५८० प्रकल्पांचे काम सुरू आहे. (Solar Energy Projects)

महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील ग्राहकांसाठी (घरगुती, गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना) छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून ४० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल (IAS Vijay Singhal) सातत्याने आढावा घेत आहेत. तर संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे (Prasad Reshme) यांनी परिमंडलांना भेटी देत या योजनेला वेग दिला आहे. (Solar Energy Projects)

 

 

 

घरगुती ग्राहकांसाठी १ ते ३ किलोवॅटपर्यंत ४० टक्के आणि ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते १० किलोवॅटपर्यंत २० टक्के अनुदान देण्यात येत आहे. उदा. ३ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा यंत्रणेसाठी सुमारे १ लाख २४ हजार रुपयांचा खर्च येतो. त्यामध्ये ४० टक्के अनुदानाप्रमाणे सुमारे ४९ हजार ६०० रुपयांचे केंद्रीय वित्त सहाय्य मिळेल व संबंधीत ग्राहकास प्रत्यक्षात सुमारे ७४ हजार ४०० रुपयांचा खर्च करावा लागेल. तसेच सामुहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था (Group Housing Society) व निवासी कल्याणकारी संघटना (Residential Welfare Association) ग्राहकांना २० टक्के अनुदान देण्यात येत आहे.

 

पुणे परिमंडलामध्ये आतापर्यंत उच्च व लघुदाबाच्या ७५८० घरगुती ग्राहकांकडे ७२ मेगावॅट, १३६४ वाणिज्यिक- ३६.११ मेगावॅट, ६४१ औद्योगिक- ११०.२८ मेगावॅट आणि इतर ५८५ ग्राहकांकडे ३५.५५ मेगावॅट क्षमतेचे छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. तर १७.८३ मेगावॅटचे २८८० घरगुती, १५.०१ मेगावॅटचे ३४३ वाणिज्यिक, ५५.६४ मेगावॅटचे २२४ औद्योगिक तर ८.३१ मेगावॅटचे १३३ इतर वर्गवारीतील सौर प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे.

पुणे परिमंडलामध्ये छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांना मोठा वेग देण्यात आला आहे.
यामध्ये गणेशखिंड येथील विश्रामगृहाच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प
उभारण्यात आला असून त्याद्वारे अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
तसेच निवडसूचीवरील ‘सौर’च्या ४५ एजन्सीजच्या प्रतिनिधींना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. सोबतच सर्व ४१ उपविभाग कार्यालयांतील सहायक अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) आणि ‘सौर’ एजन्सीजच्या प्रतिनिधींची संयुक्त कार्यशाळा नुकतीच झाली.

 

मनोगत : मुख्य अभियंता राजेंद्र पवार (Chief Engineer Rajendra Pawar) – छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे घरगुती वैयक्तिक व
सोसायट्यांच्या वीजबिलांच्या खर्चात कपात होऊन त्यांना मोठा आर्थिक फायदा होत आहे.
प्रकल्प उभारणीचा खर्च चार ते पाच वर्षांमध्ये भरून निघतो व त्याचा पुढे सुमारे २५ वर्ष लाभ होतो.
यासह सौर प्रकल्पाच्या यंत्रणेला लावलेल्या नेटमिटरिंगद्वारे वर्षाअखेर शिल्लक वीज प्रतियुनिटप्रमाणे महावितरणकडून विकत घेतली जात आहे.
वीजबिलातील आर्थिक बचत व पर्यावरणस्नेही म्हणून वीजग्राहकांनी छतावरील सौर ऊर्जा योजनेचा लाभ घ्यावा.

Web Title : Pune Solar Energy Projects | Mahavitaran Punekar’s ‘solar’ flight in energy generation at
254 MW; Ten thousand solar power projects for domestic, commercial and industrial customers

Related Posts