IMPIMP

Pune University – SPPU News | अश्लील रॅप साँग शूट केल्याचा अभाविपचा आरोप, पुणे विद्यापीठात तोडफोड (व्हिडिओ)

by nagesh
Pune University - SPPU News | abvp aggressive  protest in sppu pune  university against rap song shooting

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाईन – Pune University – SPPU News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात Savitribai Phule Pune University (SPPU) अश्लील गाण्याचं चित्रीकरण (Obscene Rap Song Shoot) करण्यासाठी परवानगी दिल्याचा निषेध करत सोमवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी (ABVP Pune) विद्यापीठात जोरदार निदर्शने केली. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी परिषदेच्या बैठकीत घुसून घोषणाबाजी करत कागदपत्रे फाडली. तसेच दरवाजा आणि खिडक्यांच्या काचा फोडून राडा घातला. यामुळे विद्यापीठात एकच खळबळ उडाली असून या राड्यानंतर कुलगुरूंनी (Vice-Chancellor) तात्काळ बैठक थांबवली. विद्यार्थ्यांनी जवळपास एक तास आंदोलन केले. (Pune University – SPPU News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अभविपने म्हटले, काही दिवसांपूर्वी या ठिकाणी रॅप साँगचं शुटिंग झाले. आम्हाला लाज वाटते की, आज त्याच खुर्चीवर कुलगुरू बसले आहेत. ज्यावेळी कुलगुरूंनी कारवाई करायला हवी होती तेव्हा त्यांनी कोणताही कारवाई केलेली नाही. अद्याप दीक्षांत समारंभ (Convocation Ceremony) झाला नाही. 70 दिवस झाले तरी विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळेवर झालेल्या नाहीत. (Pune University – SPPU News)

 

अभविपने पुढे म्हटले की, आम्ही तोडफोड केली नाही. संवैधानिक मार्गाने आंदोलन (Agitation) केल्याचे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात बैठक सुरु असलेल्या सभागृहात दरवाजाच्या काचा फुडलेल्या आणि त्याचा खच सभागृहात पडलेलाही दिसत आहे.

 

अभाविपचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते. त्यामुळे सिनेट सदस्यांनी हस्तक्षेप करुन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलकांनी सिनेटच्या सदस्यांचेही ऐकले नाही. काही कार्यकर्त्यांनी तर बैठकीच्या ठिकाणी ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे गोंधळ आणखीनच वाढला. महत्त्वाचे म्हणजे बैठकीच्या ठिकाणी पाच ते सहा सुरक्षा रक्षक होते. मात्र, त्यांनी या आंदोलनकर्त्यांना आडवलं नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या संपूर्ण घटनेनंतर कुलगुरूंनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली आहे. त्या समितीची बैठक सुरु आहे. संध्याकाळ पर्यंत ही समिती अनुमान काढेल. आजची ही पहिलीच बैठक असून यानंतर आणखी दोन बैठका होणार असून त्यानंतर कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे. याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे.

 

 

Web Title :- Pune University – SPPU News | abvp aggressive  protest in sppu pune  university against rap song shooting

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे-लोहगाव क्राईम न्यूज : विमाननगर पोलिस स्टेशन – महिलेचा हात पिरगाळुन गाऊन फाडला, अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी दोंघाविरूध्द गुन्हा

Sahil Pandurang Margaje | धनकवडी : जिल्हास्तरीय जिमनॅस्टिक स्पर्धेत साहिल मरगजेची नेत्रदीपक कामगिरी; वरिष्ठ गटात पटकावली 7 पदके

Chandrakant Patil On SRA In Pune | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या योजनांचा आढावा

 

Related Posts