IMPIMP

Pune Weather News | पुण्यात पुन्हा वाढला गारठा; किमान तापमान गेले सिंगल डिजिटमध्ये, आल्हाददायक वातावरणाचा अनुभव

by nagesh
Pune Weather News | cold snap increased again in Pune; The minimum temperature went into single digits, experiencing a pleasant atmosphere

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Weather News | हिमालयात होत असलेल्या बर्फवृष्टी, उत्तरेकडून येणार्‍या थंड वार्‍यांचा जोर वाढल्याने राज्यात पुन्हा थंडी वाढली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शहरांमधील किमान तापमान पुन्हा सिंगल डिजिटमध्ये गेले आहे. पुण्यात फेब्रुवारी महिन्यात यंदा प्रथमच किमान तापमान ९.३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले आहे. राज्यात आज सर्वांत कमी किमान तापमान जळगाव येथे ७.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. (Pune Weather News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सध्या थंडी असली तरी बोचरे वारे नाहीत. त्यामुळे खूप हुडहुडी भरेल,अशी थंडी वाजताना दिसत नाही. निरभ्र आकाश आणि स्वच्छ सूर्यप्रकाशासहित आल्हाददायक वातावरणाचा अनुभव सध्या पुणेकरांसह राज्यातील जनता घेताना दिसत आहे. उत्तर भारतात एका पाठोपाठ थंड वार्‍याची साखळी तयार होत असल्याने थंडीचा प्रभाव वाढला आहे.

 

फेब्रुवारी महिन्यात पुणे शहरातील सरासरी किमान तापमान हे १२.७ अंश सेल्सिअस इतके असते. फेब्रुवारी सुरु झाला तरी थंडी कशी असा अनेकांना प्रश्न पडला असला तरी दरवर्षी साधारण काही दिवस तरी पुण्यातील किमान तापमान १० अंशांच्या खाली जात असते. गेल्या १० वर्षाचा आढावा घेतला तर फक्त २०१७ या वर्षीच फेब्रुवारी महिन्यात किमान तापमान हे १० अंशाच्या खाली गेलेले नव्हते. २६ फेब्रुवारी २०१७ रोजी त्या वर्षातील सर्वात कमी किमान तापमान ११.९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. (Pune Weather News)

 

९ फेब्रुवारी २०१२ रोजी सर्वात कमी किमान तापमान ४.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. त्यानंतर ९ फेब्रुवारी २०१९ रोजी ५.१ अंश सेल्सिअस किमान तापमान राहिले होते.

१० फेब्रुवारी २०१४ – ७.८ अंश
९ फेब्रुवारी २०२१ – ८.६ अंश
४ फेब्रुवारी २०१६ – ८.७ अंश
१८ फेब्रुवारी २०१३ – ९.१ अंश
११ फेब्रुवारी २०१८ – ९.२ अंश
६ फेब्रुवारी २०११ – ९.८ अंश

अशा प्रकारे गेल्या दहा वर्षातील ९ वर्षांमध्ये फेब्रुवारी महिन्यात किमान तापमान हे काही दिवस तरी १० अंशांच्या
खाली जात असल्याचे दिसून आले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Weather News | cold snap increased again in Pune; The minimum temperature went into single digits, experiencing a pleasant atmosphere

 

हे देखील वाचा :

Nagpur Crime News | पाण्याच्या टाकीत पडून 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

NCP Chief Sharad Pawar | पहाटेच्या शपथविधीवर फडणवीसांचा गौप्यस्फोट, शरद पवार म्हणाले – ‘मला वाटलं देवेंद्र हा सुसंस्कृत माणूस आहे…’

Devendra Fadnavis | पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांसोबत चर्चा झाली होती! देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट

 

Related Posts