IMPIMP

Punit Balan Group | पुनीत बालन ग्रुपच्या अर्जुन कढे आणि अंकिता गोसावींना शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार जाहिर

by nagesh
Punit Balan Group | Arjun Kadhe and Ankita Gosavi of Punit Balan Group announced Shiv Chhatrapati Sports Awards

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Punit Balan Group | राज्य शासनाच्या शिवछत्रपती क्रिडा पुरस्कारांमध्ये (Shiv Chhatrapati Rajya Krida Puraskar) पुनीत बालन ग्रुपच्या दोन खेळांडुचा समावेश आहे. यामध्ये 2019-20 या वर्षांच्या पुरस्कारासाठी अ‍ॅथलेटिक्स क्रिडा (Athletics Sports) प्रकारात अंकिता गोसावी (Ankita Gosavi) आणि 2021-22 या वर्षासाठी लॉन टेनिसपट्टू (lawn Tennis) अर्जुन कढे (Arjun Kadhe) यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. (Punit Balan Group)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

युवा उद्योजक पुनीत बालन (Young entrepreneur Punit Balan) यांच्या पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून खेळांडुना खेळांसाठी सर्वोतोपरीचे सहकार्य केले जाते. अनेक खेळांडुंशी या ग्रुपने सहकार्य करार केला असून त्यातंर्गत या खेळांडुना आर्थिक सहकार्य, क्रिडा मार्गदर्शक, परदेशात तसेच देशातंतर्गत स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रवास सुविधा, आरोग्य सुविधा, आहार अशा पध्दतीची सर्वोतोपरी मदत केली जाते. त्यामध्ये लॉन टेनिसपटू अर्जुन कढे आणि अ‍ॅथलेटिक्स पट्टू अंकिता गोसावी हे दोघेही खेळाडु पुनीत बालन ग्रुपचे आहेत. या दोघांनाही त्यांच्या खेळांसाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची मदत या ग्रुपकडून केली जाते. राज्य शासनाने नुकतेच सलग तीन वर्षांच्या शिवछत्रपती क्रिडा पुरस्कारांची घोषणा केली. त्यात या दोन्ही खेळांडुंना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. (Punit Balan Group)

याबाबत बोलताना अर्जुन कढे याने ‘पुनीत बालन यांच्या सहकार्यामुळेच मी या पुरस्कारासाठी पात्र ठरलो. त्यांचा सपोर्ट असल्यामुळे आपल्या मागे कोणीतरी खंबीरपणे उभे आहे असे वाटते. त्यामुळे माझ्या खेळावर पुर्णपणे लक्ष केंद्रित करता आले. मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्या पाठिंब्यांवरच पुढील वर्षी ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत मी खेळणार आहे.’

तर अंकिता गोसावी म्हणाली, ‘मी मध्यमवर्गीय कुंटुंबातील असल्याने स्पर्धांसाठीचा खर्च, आहार, साहित्य घेणे जिकरीचे ठरते.
मात्र, पुनीत बालन ग्रुपच्या मदतीमुळे मला हे सर्व शक्य होत आहे. त्यामुळे मला खुप मोठा आधार मिळाला.
त्यांचे आभार शब्दात व्यक्त करता येणार नाही’ अशी माझी भावना आहे.

महाराष्ट्र शासनाचा क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च असलेला शिवछत्रपती पुरस्कार अंकिता आणि अर्जुन यांना जाहिर झाल्याचा मनस्वी आनंद झाला आहे.
हे दोन्हीही खेळाडु प्रतिभावंत आहे. पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्या खेळांसाठी अशीच सर्वोतोपरी मदत केली जाईल.

– पुनीत बालन, अध्यक्ष.

Web Title : Punit Balan Group | Arjun Kadhe and Ankita Gosavi of Punit Balan Group announced Shiv Chhatrapati Sports Awards

Related Posts