IMPIMP

Pune Police Combing Operation | पुणे पोलिसांचं ‘कोम्बिंग ऑपरेशन’ ! स्वत: पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक ‘फिल्ड’वर

पोलिसांकडून 1593 गुन्हेगारांची चेकिंग, मिळून आलेल्या 393 जणांची झाडाझडती

by nagesh
Pune Police Combing Operation | Police Commissioner Ritesh Kumar himself, Joint Police Commissioner Sandeep Karnik on the ‘field’

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police Combing Operation | पुणे शहरात वाढत असलेल्या गन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर आणि सोमवती अमावस्या (गटारी अमावस्या-Gatari Amavasya) निमित्ताने पुणे पोलिसांनी शहरात कोम्बींग ऑपरेशन (Pune Police Combing Operation) व नाकाबंदी चेकींग राबवण्यात आली. यावेळी स्वत: पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) आणि सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik) यांनी रस्त्यावर उतरून वेगेवगेळ्या ठिकाणी भेटी देऊन कारवाईची पाहणी केली. पोलिसांनी रविवारी (दि.16) सायंकाळी 6.00 ते सोमवार (दि.17) पहाटे 6.00 दरम्यान कोम्बींग ऑपरेशन केले.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पुणे शहरातील सर्व पोलीस स्टेशन (Police Stations In Pune) व गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) वतीने कोम्बिंग ऑपरेशन मोहीम (Pune Police Combing Operation) राबविण्यात आले. या मोहिमेत पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार तसेच गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी शहरातील वेगवगेळ्या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन व तपासणी करुन कारवाई केली.

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये कोम्बिंग ऑपरेशन करुन गुन्हेगारांना चेकींग करुन प्रतिबंधक कारवाई करणे, हॉटेल, लॉज, ढाबे, एस.टी व बस स्थानके (Bus Stops In Pune), रेल्वे स्टेशन (Pune Railway Station) तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळून येणारे संशयीत व्यक्ती, घटना इत्यादींची कसून तपासणी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या मोहीमेत 1593 गुन्हेगारांना चेक कररण्यात आले असून त्यापैकी 393 गुन्हेगार मिळून आले आहेत.

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये 32 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. यामध्ये 2331 वाहने तपासण्यात आली.
तसेच 134 हॉटेल, लॉजेस, गेस्टहाऊस चेक करण्यात आली. तर 257 फरार व पाहिजे आरोपी आणि 228 तडीपार आरोपींना चेक
करण्यात आले. नाकाबंदी दरम्यान 3943 संशयित वाहन चालकांना चेक करुन 767 जणांवर कारवाई करुन 6 लाख 92 हजार रुपयांचा
दंड वसूल केला आहे. कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान आर्म अ‍ॅक्ट (Arm Act), प्रोव्हिबीशन अ‍ॅक्ट (Prohibition Act), महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act) आणि जुगार अ‍ॅक्ट (Gambling Act) अंतर्गत 29 कारवाया करुन 38 जणांना अटक (Arrest) केली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Ritesh Kumar) यांच्या आदेशान्वये पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक,
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण पाटील (IPS Pravinkumar Patil),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), अपर पोलीस आयुक्त गुन्हे
रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende),
पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 संदीप सिंह गिल्ल (IPS Sandeep Singh Gill), पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 स्मार्तना पाटील
(IPS Smartana Patil), पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 सुहेल शर्मा (IPS Suhail Sharma),
पोलीस उपायुक्त परिमंडळ – 4 शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate), पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 विक्रांत देशमुख
(DCP Vikrant Deshmukh), पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग विजयकुमार मगर (Traffic DCP Vijayakumar Magar)
यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, वाहतूक शाखा व पोलीस ठाण्याचे अधिकारी,अंमलदार यांच्या पथकाने संयुक्तपणे हे
कोम्बिंग ऑपरेशन राबविले.

Web Title : Pune Police Combing Operation | Police Commissioner Ritesh Kumar himself, Joint Police Commissioner Sandeep Karnik on the ‘field’

Related Posts