IMPIMP

Punit Balan Group | काश्मीर खोऱ्यातील तायक्वांदो खेळाडू मुशरफ कयुमच्या कीक्ला ‘पुनीत बालन ग्रुप’चे बळ

by sachinsitapure
Punit Balan Group

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Punit Balan Group | काश्मीर खोऱ्यातील युवा तायक्वांदो खेळाडू मुशरफ कयूम (Taekwondo player Musharraf Qayyum) हा आता ‘पुनीत बालन ग्रुप’शी करारबद्द झाला आहे. मुशरफ याच्या खेळातील करिअरसाठी पुनीत बालन ग्रुपकडून (Punit Balan Group) सर्वतोपरी मदत केली जाणार आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्हयातील अठरा वर्षीय मुशरफ कयुम याने वयाच्या सातव्या वर्षापासून स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय स्तरावरील (National Level Taekwondo) अनेक स्पर्धांत चमकदार कामगिरी केलेली आहे. तायक्वांदो स्पर्धेत त्याने ब्लॅक बेल्ट मिळविलेल्या मुशरफ याने राष्ट्रीय पातळीवर ब्राँझ पदक तसेच ज्युनिअर नॅशनल तायक्वांदो स्पर्धेत सिल्वर पदक मिळविले आहे. याशिवाय खेलो इंडिया स्पर्धेत गोल्ड पदकही मिळवले आहे. तसेच मार्शल आर्ट खेळात तब्बल ३७ सुवर्ण पदके मिळवली आहेत. मुशरफ याची ही चमकदार कामगिरी लक्षात घेऊन युवा उद्योजक पुनीत बालन (Young Entrepreneur Punit Balan) यांनी त्यास खेळासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा सहकार्य करार नुकताच झाला आहे. या करारानुसार ‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून मुशरफ याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी लागणारी सर्व प्रकारची मदत केली जाणार आहे. (Punit Balan Group)

“दहशतीच्या छायेत वाढलेल्या काश्मीर खोऱ्यातील तरुण वर्ग आता विविध क्षेत्रात आपली चमक दाखवत आहे.
अशा गुणवंत खेळांडूच्या मागे ‘पुनीत बालन ग्रुप’ नेहमीच पाठीशी राहिला आहे. मुशरफ कयुम हा नक्कीच देशाचे आणि काश्मीरचे नाव जगात उंचावेल अशी खात्री आहे.”

पुनीत बालन (अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप)
(Punit Balan (Chairman, Punit Balan Group)

Related Posts