IMPIMP

Pune Crime News | पुणे : सेवानिवृत्त अति वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याची दीड कोटींची फसवणूक, प्रचंड खळबळ

by sachinsitapure
Cheating Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | फुटवेअर कंपनीत (Footwear Company) गुंतवणुक (Investment) करण्यास सांगून कोणताही परतावा न देता कराराचा भंग करुन अति सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याची (Retired Senior Police Officer) १ कोटी ५५ लाख रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याप्रकरणी पुण्यातील मॉडेल कॉलनीमध्ये राहणार्‍या 75 वर्षीय सेवानिवृत्त अति वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६४१/२३) दिली आहे. त्यानुसार राजेश वसंतराव कारंडे Rajesh Vasantrao Karande (वय ५७), निलेश वसंतराव कारंडे (Nilesh Vasantrao Karande) यांच्यासह 3 महिलांवर (सर्व रा. मॉडेल कॉलनी) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१७ पासून आतापर्यंत घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपींनी त्यांच्या
कास फुटवेअर प्रा. लि. कंपनीत (Kas Footwear Pvt. Ltd. Company) गुंतवणुक करण्यास सांगितले.
फिर्यादी यांच्या मुलाबरोबर त्यांनी पार्टनरशिप (Partnerships) करुन कंपनीत १ कोटी ५५ लाख रुपये गुंतवणूक केली. या गुंतवणुकीपोटी पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी (Power of Attorney) करण्यात आली. त्यांना शेअर्स सर्टिफिकेटही (Shares Certificate) देण्यात येऊन करारनामा करण्यात आला होता, असे असताना राजेश कारंडे व इतरांनी फिर्यादी यांचे शेअर्स परस्पर ट्रान्सफर केले. त्यांना परतावा म्हणून दिलेले धनादेश परत आले. त्यानंतर आपली फसवणूक (Fraud Case) झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता. त्यानंतर पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate) यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक जानकर (PI Jankar) अधिक तपास करीत आहेत.

Related Posts