IMPIMP

Pune Crime News | गणपती वर्गणीसाठी दुकानदाराला मारहाण करुन तोडफोड; लोणी स्टेशन येथील चौघांवर गुन्हा दाखल (Video)

by sachinsitapure
Beating

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | गणेशोत्सवासाठी (Ganesh Utsav) ३ हजार रुपयांची वर्गणी देण्याचा तगादा लावून इतकी वर्गणी देण्यास तयार नसल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दुकानदाराला मारहाण (Beating) करुन दुकानाची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत दिनेश भिकाराम गोरा (वय २०, रा. लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५७१/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शिवम जयपाल सिंग ऊर्फ मुन्ना Shivam Jaipal Singh alias Munna (वय २७), तुषार संजय थोरात Tushar Sanjay Thorat (वय १९), निखिल दिलीप कांबळे Nikhil Dilip Kamble (वय १९) व त्यांच्या एका साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार लोणी स्टेशन येथील न्यू बालाजी ट्रेडर्समध्ये (New Balaji Traders Loni Station) रविवारी रात्री आठ वाजता घडली. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या भावासोबत किराणा दुकानात काम करत होते.
त्यावेळी श्रीमंत काळभैरवनाथ प्रतिष्ठान मंडळ (Shrimant Kalbhairavnath Pratishthan Mandal)
व अष्टविनायक मंडळाचे (Ashtavinayaka Mandal) कार्यकर्ते त्यांच्याकडे वर्गणी मागण्यासाठी आले. त्यांनी फिर्यादीकडे ३ हजार रुपयांची वर्गणी मागितली. फिर्यादी हे १०१ रुपये वर्गणी देण्यास तयार होते. तरीही ३ हजार रुपयांची पावती फाडावी, अशी त्यांनी मागणी केली. फिर्यादीने त्याला नकार दिल्यावर शिवम व निखिल यांनी फिर्यादी यांना हाताने मारहाण करुन शिवीगाळ केली. तुषार याने दुकानातील कॅल्युलेटर व मोबाईलची तोडफोड करुन शिवीगाळ केली. पोलीस उपनिरीक्षक धायगुडे (PSI Dhaygude) तपास करीत आहेत.

Related Posts