IMPIMP

R M D Foundation | आर एम डी फाऊंडेशनच्या स्पर्धा युवकांना एकत्रीत बांधण्याचे कार्य करते, शोभा आर धारीवाल यांचे प्रतिपादन

by nagesh
R M D Foundation | RMD Foundation's competitions work to unite youth, says Shobha R Dhariwal

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   ग्रामीण भागातील तरुणांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा योग्य उपयोग करुन घेतल्यास नक्कीच क्रांती घडेल. आर
एम डी फाउंडेशन (R M D Foundation) द्वारा आयोजीत रांजणगाव स्पर्धा (Ranjangaon Competition) म्हणजे या युवकांना एकत्रीत बांधण्याचे
कार्य करते असे मत फाऊंडेशनच्या (R M D Foundation) उपाध्यक्ष शोभा आर धारीवाल (Shobha R Dhariwal) यांनी व्यक्त केले. त्या रांजणगाव
गणपती येथे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेच्यावेळी (Marathon Competition) बोलत होत्या. मॅरेथॉन स्पर्धेचे हे पाचवे वर्ष असून यंदाच्या स्पर्धेमध्ये पाच
हजार पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सकाळी साडेसहा वाजता आर एम डी फाऊंडेशनच्या (R M D Foundation) उपाध्यक्ष शोभा आर धारीवाल, अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन (President Janhvi Dhariwal Balan), आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu), पुनीत बालन समूह (Punit Balan Group) व इंद्राणी बालन फाऊंडेशनचे (Indrani Balan Foundation) पुनीत बालन (Punit Balan), अभिनेते श्रेयस तळपदे (actor Shreyas Talpade) यांच्या हस्ते ध्वज फडकवून स्पर्धेला सुरुवात झाली.

 

यावेळी बोलताना आमदार बच्चू कडू यांनी आर एम डी फाऊंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच या फाऊंडेशनच्या माध्यमातून विदर्भात दोन हजार महिलांना गारमेंट हबच्या माध्यमातून प्रशिक्षण व रोजगार प्रकल्प साकारण्यात येत आहे. त्याबद्दल त्यांनी फाऊंडेशनचे आभार मानले. अभिनेता श्रेयस तळपदे यांनी स्पर्धकांना धावण्याचे महत्व आपल्या शैलीत समजावून सांगितले. तर तुम्ही दरवर्षी स्पर्धेत सहभागी व्हा मी सुद्धा सहभागी होईल अशी ग्वाही पुनीत बालन यांनी दिली. जान्हवी धारीवाल बालन यांनी फाऊंडेशन ग्रामीण भागातील युवकांसाठी नेहमीच सोबत राहिल असे आश्वासन दिले.

 

यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना विविध पुरस्कार, रोख बक्षीस, प्रमाणपत्र,
मेडल याशिवाय जास्तीत जास्त संख्येने स्पर्धेत सहभाग नोंदवणाऱ्या शाळा-महाविद्यालयांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचे कुलर मशीन व आर ओ मशीन देण्यात येत असल्याची घोषणा यावेळी जान्हवी धारीवाल बालन यांनी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी महागणपती फाऊंडेशनचे (Ranjangaon Mahaganpati Foundation)
अध्यक्ष सागर पाचुंदकर (Sagar Pachundkar) व पदाधिकारी यांनी पाहिली.
यावेळी पोलीस निरीक्षक बलवंत मांगडे (Police Inspector Balwant Mangde),
युवासेना पुणे जिल्हाध्यक्ष संदीप शिंदे, मानव विकास परिषद महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संदीप कुटे, राजेश लांडे,
आतिश राऊत, श्रीकांत पाचुंदकर, दत्तात्रय पाचुंदकर व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

 

Web Title :- R M D Foundation | RMD Foundation’s competitions work to unite youth, says Shobha R Dhariwal

 

हे देखील वाचा :

Health Tips | निरोगी शरीरासाठी रोज करा या फूडचे सेवन, वेट लॉस आणि इम्युनिटी वाढण्यासह होतील हे ७ मोठे फायदे

Sanjay Raut | संजय राऊतांचा इशारा, म्हणाले ‘हा महामोर्चा निघणारच, कोणीही…’

Pune PMC News | जी २० परिषदेच्या निमित्ताने सुशोभिकरण आणि दुरूस्तीची कामे 5 जानेवारीपर्यंत पूर्ण करणार; पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत महापालिकेचे आश्‍वासन

 

Related Posts