IMPIMP

Pune PMC News | जी २० परिषदेच्या निमित्ताने सुशोभिकरण आणि दुरूस्तीची कामे 5 जानेवारीपर्यंत पूर्ण करणार; पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत महापालिकेचे आश्‍वासन

परदेशी पाहुण्यांना शनिवार वाडा, आगाखान पॅलेस आणि जाधवगड सफरीचे आयोजन

by nagesh
Pune PMC News | Beautification and repair works to be completed by January 5 on the occasion of G20 Conference; The assurance of the Municipal Corporation in the review meeting chaired by Guardian Minister Chandrakant Patil

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune PMC News | जी २० परिषदेच्या निमित्ताने जानेवारी १५ आणि १६ रोजी होणार्‍या बैठकीसाठी सुशोभिकरण व
दुरूस्तींची कामे ५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येतील. परदेशी पाहुण्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच आगा खान पॅलेस, शनिवार वाडा आणि
पुरंदर तालुक्यातील दिवे गावाजवळील जाधव गढी या ऐतिहासिक स्थळांना भेटीचे देखिल नियोजन करण्यात आले आहे. या भेटी दरम्यान विमानतळ ते
सेनापती बापट रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दोन ते तीन दिवस या मार्गावरील मेट्रोचे काम बंद ठेवण्याबाबत मेट्रो प्रशासनासोबत चर्चा
करण्यात येईल, असे आश्‍वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासोबत झालेल्या आढावा बैठकीत देण्यात आल्याची माहिती
महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जी २० परिषदेच्या तीन बैठका जानेवारी ते जून महिन्यादरम्यान पुण्यामध्ये होणार आहेत. या बैठकीसाठी ३६ देशांचे सुमारे १५० ते २०० प्रतिनिधी उपस्थित राहाणार आहेत. जानेवारीमध्ये होणार्‍या बैठकीच्या अनुषंगाने पुणे महापालिकेने परदेशी पाहुण्यांच्या दौर्‍यातील रस्त्यांची दुरूस्ती, चौकांचे सुशोभिकरण, पथदिव्यांची दुरूस्तीची कामे सुरू केली आहेत. या बैठकीच्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवन येथे आढावा बैठक झाली. या बैठकीला विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त शेखर सिंह (Municipal Commissioner of Pimpri Chinchwad Shekhar Singh), जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh), सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (Jt CP Sandeep Karnik), पोलिस अधीक्षक अंकित गोयल (Pune Rural SP Ankit Goyal) आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Pune PMC News)

 

या परिषदेचे कार्यक्रम प्रामुख्याने महापालिकेच्या हद्दीमध्ये होत असल्याने पालिकेवर मोठी जबाबदारी आहे.
बैठकीतील चर्चेविषयी माहिती देताना विक्रम कुमार यांनी सांगितले, की महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव परदेशी पाहुण्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मर्दानी खेळ, पोवाडा, पारंपारिक नृत्य आदी कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. पुण्याचे ब्रँडींग करण्यासाठी पर्यटन विभागाकडून माहिती पट तयार करण्यात येत आहे. गोल्फ क्लब येथील उड्डाणपूलाचे काम अंतिम टप्प्यामध्ये असून ५ जानेवारीपर्यंत या पुलाचे काम पुर्ण झालेेले असेल. पाहुण्यांच्या शनिवार वाडा भेटीदरम्यान लाईट ऍन्ड साउंंड शोचेही आयोजन करण्यात येणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जी २० परिषदेअंतर्गत पुण्यात तीन बैठका होत आहे, ही शहरासाठी भाग्याची गोष्ट आहे.
एवढे मोठे आयोजन करण्यासाठी नागरिकांचे योगदान महत्वाचे आहे. बैठकांच्या निमित्ताने पुण्याची प्रगती,
क्षमता आणि संस्कृती जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करावे असे आदेश देण्यात आले आहेत.

– चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

 

Web Title :- Pune PMC News | Beautification and repair works to be completed by January 5 on the occasion of G20 Conference; The assurance of the Municipal Corporation in the review meeting chaired by Guardian Minister Chandrakant Patil

 

हे देखील वाचा :

Supreme Court | लाच मागितल्याचा थेट पुरावा आवश्यक नाही- सर्वोच्च न्यायालय

Pune PMC News | फ्लॅट ताब्यात देण्यापुर्वीचा मिळकत कर भरण्यास टाळाटाळ करणार्‍या बिल्डरविरूध्द ‘रेरा’ कडे तक्रार करणार : मनपा आयुक्त विक्रम कुमार

Maharashtra Politics | शिरूर तालुक्यात भाजपची मोठी खेळी; राष्ट्रवादीला शह देण्यासाठी फडणवीसांचा शिलेदार मैदानात?

 

Related Posts