IMPIMP

Health Tips | निरोगी शरीरासाठी रोज करा या फूडचे सेवन, वेट लॉस आणि इम्युनिटी वाढण्यासह होतील हे ७ मोठे फायदे

by nagesh
Health Tips | eating boiled eggs daily is beneficial for health know the benefits of eating it

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – Health Tips | अंड्यामध्ये अनेक पोषक तत्त्व असतात जे शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. अंडे खाण्याचा योग्य मार्ग म्हणजे ते उकडणे. ज्यांना आपले वजन कमी करायचे आहे किंवा इम्युनिटी वाढवायची आहे त्यांनी उकडलेले अंडे जरूर खावे. उकडलेल्या अंड्यामध्ये व्हिटॅमिन ए, फोलेट, व्हिटॅमिन बी५, व्हिटॅमिन बी१२, व्हिटॅमिन बी२, फॉस्फरस, सेलेनियम, कॅल्शियम आणि झिंकदेखील असते. यामुळे अंडी हे सुपरफूडपेक्षा कमी नाही. उकडलेल्या अंड्याचे सेवन आरोग्यासाठी कशाप्रकारे फायदेशीर ठरते ते जाणून घेऊया. (Health Tips)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

१. वजन कमी करण्यासाठी
उकडलेले अंडे हे प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. ते खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते आणि तुम्हाला जास्त कॅलरीजही खाव्या लागत नाहीत. यामुळे वजन कमी करण्यासाठी अंडी फायदेशीर ठरतात. उकडलेले अंडे भाज्यांसोबत सॅलड बनवूनही खाऊ शकता.

 

२. वाढते इम्युनिटी
अंड्यामध्ये झिंक तसेच व्हिटॅमिन बी ६ आणि बी १२ असते आणि यामुळे इम्युनिटी वाढण्यास आणि फ्लू आणि सर्दीशी लढण्यास मदत होते.

 

३. हाडे बनवा मजबूत
अंडी व्हिटॅमिन डीचा एक चांगला स्रोत आहे, ज्यामुळे तुमची इम्युनिटी वाढतेच, शिवाय हाडे सुद्धा मजबूत होतात.

 

४. मेंदूसाठी चांगले
अंड्यामध्ये कोलीन आढळते जे वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन आहे. हे सेलम मेंबरन बनवण्याचे काम करते जे मेंदूशी संबंधित आहे. यामुळे उकडलेल्या अंड्याचे सेवन मेंदूच्या आरोग्यासाठीही चांगले असते. (Health Tips)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दररोज १ ते २ उकडलेली अंडी खाणे आरोग्यासाठी चांगले असते. अंडी जास्त खाऊ नका कारण त्याचा आरोग्यावर विपरीत परिणामसुद्धा होऊ शकतो.

 

५. चांगले होते मेटाबॉलिज्म
अंडे मेटाबॉलिज्म आणि डायजेशन सुधारण्यात योगदान देते. उकडलेले अंडे शरीराला कॅलरीज बर्न करण्यास देखील मदत करते, ज्यामुळे मेटाबॉलिज्मला बूस्ट मिळते.

 

६. डोळ्यांसाठी आरोग्यदायी
उकडलेल्या अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन भरपूर प्रमाणात असते,
जे डोळ्यांचे रक्षण करते आणि मोतीबिंदूचा धोका देखील कमी करते, त्यामुळे निरोगी डोळे मिळविण्यासाठी उकडलेले अंडे खा.

 

७. केस ठेवा निरोगी
प्रदूषणामुळे केसांचे आरोग्य राखणे थोडे कठीण आहे, परंतु अंडी हे काम चांगले करू शकतात.
अंड्यात बायोटिन असते, जे केस निरोगी आणि चमकदार ठेवण्यास मदत करते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Health Tips | eating boiled eggs daily is beneficial for health know the benefits of eating it

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | संजय राऊतांचा इशारा, म्हणाले ‘हा महामोर्चा निघणारच, कोणीही…’

Nana Patole | नाना पटोलेंचा भाजपवर गंभीर आरोप! म्हणाले ‘देशातील तरुण पिढीला नशेच्या आहारी घालवण्याचे….’

Supreme Court | लाच मागितल्याचा थेट पुरावा आवश्यक नाही- सर्वोच्च न्यायालय

 

Related Posts