IMPIMP

Rajiv Gandhi Zoological Park Pune | राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील प्राणीही घेताहेत ‘ठंडा ठंडा कुल कुल’चा अनुभव ! ऊन आणि उष्णतेपासून बचावासाठी प्रशासनाकडून विशेष उपाययोजना; आहारातही बदल

by nagesh
Rajiv Gandhi Zoological Park Pune | Even the animals of Rajiv Gandhi Zoo experience 'Thanda Thanda Kul Kul'! Special measures taken by the administration to protect against heat and heat; Change in diet too

पुणे (अनिल पाटणकर) : सरकारसत्ता ऑनलाईन – Rajiv Gandhi Zoological Park Pune | गेले काही दिवसांपासून हवामानात होत असलेल्या लहरी बदलामुळे संपूर्ण देशात उष्णतेची लाट पसरल्याचे चित्र असतानाच पुणे शहरातील तापमानही जवळपास ४० अंशावर पोहोचले आहे.त्यामुळे पुणेकर नागरिकांसह येथील प्राणी-पक्षीही हैराण झाले आहेत मात्र ज्याप्रकारे नागरिक स्वसंरक्षणासाठी छत्री,टोपी यासोबतच विद्युत उपकरणांचा वापर करून उष्णतेपासून सुटका मिळविण्याचा प्रयत्न करीत असतात अगदी त्याच पद्धतीने कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्राहालयातील (Katraj Zoo Pune) प्राण्यांचेही या ऊन आणि उष्णतेपासून रक्षण व्हावे म्हणून जवळपास सर्वच प्राण्यांसाठी थंडावा निर्माण होईल अशा पद्धतीने विशेष उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. (Rajiv Gandhi Zoological Park Pune)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुणे शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्राहालयातील विविध प्राणी,पक्षी व सर्प यांना त्याच्या आवश्कतेप्रमाणे उपाययोजना करण्यात येत असून वाघ, हत्ती, अस्वल, साप यासारख्या प्राण्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. उन्हामुळे त्यांच्या आहारातही योग्य तो बदल करण्यात आला आहेत. या सर्व प्राण्यांचे प्रत्येक उन्हाळ्यात ज्याप्रमाणे काळजी घेतली जाते, त्याप्रमाणे यावर्षीही घेतली जात आहे. यामध्ये ह्त्तींना अंघोळ घातली जात आहे तर वाघांच्या पिंजऱ्यात फॉगर्स सोडले आहेत. हत्ती वाघ, बिबट्या आणि अस्वल यांना उन्हाच्या झळा बसू नये म्हणून त्यांच्या पिंजऱ्यात थंड पाण्याचे स्प्रिंकलर लावण्यात आले असून त्याद्वारे पिंजऱ्यातील तापमान नियंत्रित केले जात आहे. अस्वलांसाठी बर्फांपासून केलेले फ्रूट केक, वाघांसाठी कूलर, हरिण, सांबर आणि इतर प्राण्यांसाठी रेनगन, फॉगर्स बसविण्यात आले आहेत.Rajiv Gandhi Zoological Park Pune

 

सध्याच्या बदलत्या हवामानात तापमानाचा पारा वाढला किंवा रात्रीचा गारवा कमी झाला की सर्वच प्राणी उकाड्याने अस्वस्थ होतात. त्यांना ही उकाड्याचा त्रास होतो. काही प्राणी तर तासन तास पाणवठ्यामध्ये बसून राहतात. त्यामुळे उकाडा सुरू झाला की दरवर्षी त्यांना खंदक आणि पिंजऱ्यांमध्ये गारवा मिळेल, यासाठी संग्रहालया तर्फे काळजी घेतली जाते. प्राण्याच्या प्रकारानुसार अगदी साप, साळिंदरापासून ते वाघांपर्यंत प्रत्येका साठी वेगवेगळ्या उपयायोजना केल्या जातात.

 

सध्या संग्रहालयामध्ये पांढऱ्या आणि पिवळ्या वाघांसाठी कुलर बसवले आहेत. वाघांच्या खंदकामध्ये छोटा कृत्रिम पाणवठा करण्यात आला असून उकाडा वाढला की वाघ त्या पाण्यात बराच वेळ बसून राहतो आणि डोक्यावर ऊन चढल्यानंतरच तो पिंजऱ्यात येतो. त्यावेळी त्याला कूलर मुळे गारवा मिळतो, असे पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राजीव गांधी प्राणी संग्रहालयात सद्यस्थितीला ६१ प्रकारचे सुमारे ४०० प्राणी आहेत. या सर्व प्राण्यांचे ऊन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी कुलर, वॉटर फॉगर, पाण्याचे हौद, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

 

डॉ. राजकुमार जाधव (संचालक), राजीव गांधी प्राणी संग्रहालय, पुणे

 

 

Web Title :- Rajiv Gandhi Zoological Park Pune | Even the animals of Rajiv Gandhi Zoo experience ‘Thanda Thanda Kul Kul’! Special measures taken by the administration to protect against heat and heat; Change in diet too

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political News | मुख्यमंत्री नाराज आहेत का?, देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाच शब्दांत उत्तर, म्हणाले-‘तुम्ही संजय राऊतांना..’

Pune Metro News | पुणे : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचा महत्वाचा टप्पा पूर्ण, 2000 सेगमेंटची उभारणी

Chowk Marathi Movie | ‘चौक’ चित्रपटाचं कौतुकास्पद पाऊल, प्रदर्शनाची तारीख घेतली पुढे! 19 मे रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होईल ‘चौक’

Pune Crime News | अपहरण, बलात्कार गुन्ह्यातील महिला आरोपीची जिल्हा व सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

 

Related Posts