IMPIMP

Rajya Sabha Election Results | राज्यसभा निवडणूकीच्या निकालानंतर भाजप नेत्याचं मोठं विधान, म्हणाले – ‘…आता विधान परिषदेतही धक्क्यावर धक्के’

by nagesh
Rajya Sabha Election Results | bjp leader anil bonde criticised ncp sharad pawar shiv sena congress mahavikas aghadi government after rajya sabha election result 2022

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Rajya Sabha Election Results | राज्यसभेची निवडणूक (Rajya Sabha Election Results) अत्यंत अटीतटीची झाली. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) तीन तर भाजपचेही (BJP) तीन उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेनेचे उमेदवार संजय पवार (Sanjay Pawar) यांना अवघ्या दोन मतांनी पराभव स्वीकारावा लागला. भाजपचे उमेदवार डॉ. अनिल बोंडे (Dr. Anil Bonde) मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. विजयानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला. या विजयानंतर राऊत यांना विजयाची व्याख्या समजेल. राज्यसभा झाली आता विधानपरिषदेतही धक्क्यावर धक्के बसणार असे,’ त्यांनी म्हटले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

अनिल बोंडे म्हणाले, “विजयाची व्याख्या संजय राऊत यांनी पुन्हा करावी. गेल्या विधानसभेत शिवसेनेचा विजय हा त्यांचा नव्हताच. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे फोटो लावले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे पुन्हा मुख्यमंत्री होतील असे सांगून उमेदवार निवडून आणले. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन केले. यावेळी कोणाबरोबरही युती न करता तीन उमेदवार निवडून आले. त्यामुळे राऊत यांनी विजयाची व्याख्या समजून घ्यावी,” असा सल्लाही त्यांनी दिला.

 

“हा निकाल म्हणजे जोर का झटका धीरेसे लगे असा आहे.
धक्का लागल्यानंतरही विचारलं तरी शरद पवार (Sharad Pawar) म्हणतील लागले नाहीत.
ही तर पहिलीच वेळ आहे. पुढे 20 तारीख आहे. त्याच्यानंतरीही धक्क्यावर धक्के सहन करावे लागणार आहे.
त्यावेळी देखील त्यांनी सांगावे की काही लागले नाही.” असा टोलाही अनिल बोंडे यांनी लगावला. तसेच आज मुख्यमंत्र्यांना कोणता आमदार भेटू शकतो का? मंत्र्यांची भेट तरी होते का?
असा सवाल करत ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी अनेकवेळा सांगितलं की, सरकार पडण्याचा मुहूर्त सांगू नये.
आपापसातील कलहामुळे हे सरकार पडेल. हे सरकार जनतेला डोईजड झाले आहे. आमदार विटलेले आहेत.
देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी सद्सदविवेक बुद्धीला पटेल त्यानुसार मतदान करण्याचे आवाहन केले होते.
किती दिवस अपक्ष आमदार किंवा लहान पक्ष हा अन्याय सहन करणार असेही,’ ते म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title :- Rajya Sabha Election Results | bjp leader anil bonde criticised ncp sharad pawar shiv sena congress mahavikas aghadi government after rajya sabha election result 2022

 

हे देखील वाचा :

Rajya Sabha Election Results-2022 | ‘देवेंद्र फडणवीसांना माणसं आपलीशी करण्यात यश’ – शरद पवार

Sharad Pawar On Rajya Sabha Election Results | राज्यसभा निवडणूक निकालानंतर शरद पवार यांची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘चमत्कार मान्यच केला पाहिजे’

Rajya Sabha Election Results | राज्यसभेच्या निकालावरून संभाजीराजेंच्या समर्थकांचा शिवसेनेला जोरदार टोला; म्हणाले – ‘आता कसं वाटतंय, गार गार वाटतंय’

 

Related Posts