IMPIMP

Rashid Shaikh | रशिद शेख यांची काँग्रेस मध्ये घरवापसी ही भाजपसाठी धोक्याची घंटा

by nagesh
Rashid Shaikh | Rashid Shaikh's homecoming in Congress is a warning bell for BJP

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Rashid Shaikh | मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजप (BJP) मध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत भाजप सोडणारे माजी स्थायी समिती अध्यक्ष रशिद शेख यांनी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या उपस्थितीत घरवापसी
केली. कसबा विधानसभा निवडणुकीच्या (Pune Kasba Peth Bypoll Election) पार्श्वभूमीवर हा भाजपला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. (Rashid Shaikh)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रशिद शेख यांचे शहराच्या पूर्व भागात मोठे वर्चस्व आहे. त्यांची काँग्रेस मध्ये घरवापसी हे काँग्रेस आणि पर्यायाने महाविकास आघाडी साठी सुचिन्ह ठरणार आहे. कसबा विधानसभा मतदार संघाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Late MLA Mukta Tilak) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर भाजपने टिळक कुटुंबातील व्यक्तीला डावलत हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे ब्राम्हण समाजामधील नाराजी लपून राहिलेली नाही. कोथरूडच्या अमादार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांचे तिकीट कापून चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना तेथून उमेदवारी देण्यात आली. आता टिळक यांच्या निधनानंतर भाजपने त्यांच्या कुटुंबियांना डावलल्याने रोष अधिकच वाढला आहे. (Rashid Shaikh)

 

रासने यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजप मध्येच नाराजी पसरली आहे. महापालिकेच्या इतिहासात 100 नगरसेवक निवडून आल्यानंतर रासने यांना 5 वर्षात सलग चार वेळा स्थायी समिती अध्यक्षपदी संधी दिली गेली. तसेच स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर (Ganesh Bidkar) यांना सभागृह नेतेपदी नेमल्याने बाकीचे नगरसेवक हे या पदासाठी लायक नसल्याचा संदेश पुण्याच्या राजकारणात गेला आहे. पक्षाचे कट्टर कार्यकर्ते धीरज घाटे (Dhiraj Ghate) यांना अवघ्या काही दिवसांत सभागृह नेते पदावरून हटवल्याने पक्षाच्या उद्देशाबद्दल कार्यकर्ते संमभ्रमात पडले होते. प्रामुख्याने पदरचे खर्च करूनही कुठलाच ‘परतावा’ न मिळालेले नगरसेवक नाराज आहेत, हे लपून राहिलेले नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अशातच केवळ विधानसभा निवडणुकीसाठी जमवलेले रशिद शेख, सदांनंद शेट्टी (Sadanand Shetty)
यांच्यासारखे अनुभवी नगरसेवक परत काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) परतत असल्याने
ही भाजप आणि त्यांचे उमेदवार हेमंत रासने यांच्यासाठी धोक्याची घंटा वाजवणार हे निश्चित होत आहे.

 

 

Web Title :- Rashid Shaikh | Rashid Shaikh’s homecoming in Congress is a warning bell for BJP

 

हे देखील वाचा :

Pune Kasba Peth Bypoll Election | टिळक कुटुंबियांच्या भेटीनंतर काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांची BJP वर टीका, म्हणाले – ‘…तर पुणेकरचं भाजपला त्यांची जागा दाखवतील’

Pune Kasba Peth Bypoll Election | ‘…तर आम्ही टिळक कुटुंबियांना उमेदवारी देऊ;’ कसबा पोटनिवडणुकीत चंद्रकांत पाटील यांचे नाना पटोले यांना आव्हान

 

 

 

Related Posts