IMPIMP

Ratnagiri Accident News | दापोलीत मॅक्झिमो-ट्रेलरची जोरदार धडक; 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू, सातजण जखमी

by nagesh
Ratnagiri Accident News | ratnagiri accident news eight dead seven injured in an accident between car and trailer in dapol

रत्नागिरी : सरकारसत्ता ऑनलाईन –  Ratnagiri Accident News | रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली (Dapoli) तालुक्यातील हर्णे मार्गावर भीषण अपघात (Ratnagiri Road Accident) झाला आहे. या अपघातात आठ जणांचा मृत्यू (Eight People Died) झाला आहे. रविवारी संध्याकाळी मॅक्झिमो (वडाप गाडी) आणि ट्रेलर यांच्यात धडक (Ratnagiri Accident News) झाली. या घटनेत बाप-लेकीसह आठ जणांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी (Seven Injured) झाले आहेत. या अपघातामध्ये मॅक्झिमोचा चक्काचूर झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

चालक अनिल सारंग (Driver Anil Sarang) (वय 45, हर्णै), संदेश कदम (Sandesh Kadam) (वय 55), स्वरा संदेश कदम (Swara Sandesh Kadam) (वय 8), मारियम काझी (Maryam Kazi) (वय 64), फराह काझी (Farah Kazi) (वय 27, सर्व अडखळ), मीरा महेश बोरकर (Meera Mahesh Borkar) (वय 22, रा. पाडले), वंदना चोगले (Vandana Chogle) (वय 34, रा. पाजपंढरी), सामीया इरफान शिरगांवकर (Samia Irfan Shirgaonkar) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. (Ratnagiri Road Accident)

सपना संदेश कदम (Sapna Sandesh Kadam) (वय 34, रा. अडखळ), श्रद्धा संदेश कदम (Shraddha Sandesh Kadam) (वय 14, रा. अडखळ), विनायक आशा चोगले (Vinayak Asha Chogle) (रा. पाजपंढरी), भूमी सावंत (Bhumi Sawant) (वय 17), मुग्धा सावंत (Mugdha Sawant) (वय 14), ज्योती चोगले (Jyoti Chogle) (वय 9, रा. पाजपंढरी) यांच्यावर उपजिल्हा व खासगी रुग्णालयात (Upazila And Private Hospital) उपचार सुरू आहेत.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत माहिती अशी की, दापोली तालुक्यातील हर्णे मार्गावर आसूद जोशी
बागेजवळ रविवारी संध्याकाळच्या सुमारास हा अपघात (Accident) घडला.
बांधकाम साहित्य रिकामे करुन आलेला रिकामा ट्रेलर दापोलीकडे येत होता. यावेळी समोरुन मॅक्झिमो घेऊन हर्णेच्या दिशेने जात होते. यावेळी वडाप गाडीत 14 प्रवासी होते. दोन्ही गाड्या जोशी बागेजवळ अवघड वळणावर आल्या. यावेळी ट्रेलरने बाहेरुन वळण घेतले. यामुळे मॅक्झिमोला पुढे जाण्यासाठी रस्ता राहिला नाही. याचवेळी ट्रेलरने या गाडीला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातानंतर ट्रेलर चालकाने जंगलामध्ये पळ काढला.

दरम्यान, अपघातात मृत्यू झालेले सर्व दापोली तालुक्यातील होते.
अपघाताची माहिती मिळताच दापोली पोलीस (Dapoli Police) घटनास्थळी दाखल झाले होते.
जखमींना उपचारांसाठी सुरुवातीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
तिथे प्राथमिक उपचार करुन काही जणांना पुढील उपचारांसाठी मुंबईला पाठवण्याची माहिती आहे.

Web Title : Ratnagiri Accident News | ratnagiri accident news eight dead seven injured in an accident
between car and trailer in dapol

Related Posts