IMPIMP

RBI Governor On Loan Recovery Agent | शिवीगाळ, अपमानास्पद वर्तन करतात लोन रिकव्हरी एजंट; आता कठोर पावले उचलण्याच्या तयारीत RBI

by nagesh
RBI Monetary Policy meeting | rbi governor shaktikanta das announces 35 bps hike in repo rate rbi raises repo rate by 35 basis points to 6 25 percentage

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाRBI Governor On Loan Recovery Agent | सहसा, लोक आपत्कालीन परिस्थिती असताना किंवा अचानक गरज असताना कर्ज (Loan) घेतात. बरेचदा असे देखील होते की कर्जाचे काही हप्ते (EMI) भरल्यानंतर लोक अडचणीत येतात आणि हप्ते चुकू लागतात. (RBI Governor On Loan Recovery Agent)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

यानंतर बँकांचे कर्ज वसुली एजंट (Loan Recovery Agent) कर्जदाराला त्रास देऊ लागतात. कर्ज वसूल करणारे एजंट कधीही फोन कॉल करतात, लोकांना अपमानास्पद वागणूक देतात आणि गैरवर्तन करतात.

या सर्व कृती बेकायदेशीर आहेत, परंतु आजकाल ते अगदी सामान्य झाले आहे. आता रिझर्व्ह बँकेनेही कर्ज वसुली एजंटच्या या कृत्यांची दखल घेतली आहे.

 

कर्ज वसूली एजंटचे कृत्य अस्वीकार्य

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी शुक्रवारी सांगितले की, कर्ज वसुली एजंट लोकांशी गैरवर्तन करतात, जे अजिबात मान्य नाही.

ते म्हणाले की, कर्ज वसुली एजंट कर्जदारांना कधीही फोन करून त्यांच्याशी गैरवर्तन करतात, जे अस्वीकार्य आहे. सेंट्रल बँक हे गांभीर्याने घेत आहे आणि कठोर पावले उचलण्यास मागेपुढे पाहणार नाही. (RBI Governor On Loan Recovery Agent)

दास यांनी FE Modern BFSI Summit मध्ये सांगितले की अशा प्रकारची कृत्य सामान्यत: अनरेग्युलेटेड फायनान्स कंपन्यांकडून केली जातात आणि रेग्युलेटेड केलेल्या कंपन्यांच्या बाबतीतही अनेकदा अशा तक्रारी प्राप्त होतात.

 

कठोर पावले उचलण्यास मागेपुढे पाहणार नाही आरबीआय

दास म्हणाले, रिझर्व्ह बँक रेग्युलेटेड केलेल्या संस्थांच्या (Regulated Entities) बाबतीत गंभीर पावले उचलणार आहे. अनरेग्युलेटेड कंपन्यांच्या (Unregulated Companies) अशा तक्रारी प्राप्त झाल्यावर, लॉ एनफोर्समेंट एजन्सींना सूचित केले जाईल.

अशा कोणत्याही तक्रारीवर कठोर कारवाई करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही. बँकांना या उपक्रमांची जाणीव करून देण्यात आली आहे. रोज नवीन आव्हाने येतात. आम्ही कर्जदार आणि सर्व बँकांना या संदर्भात विशेष लक्ष देण्याची विनंती करत आहोत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

लोन रिकव्हरी एजंटचा असा करा सामना

आरबीआयच्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार (RBI Guideline),
कर्ज वसुलीसाठी हाताच्या ताकदीचा वापर करणे किंवा धमकी देणे हे छळाच्या कक्षेत येते.

जर कोणताही रिकव्हरी एजंट तुम्हाला त्रास देत असेल, तर उशीर न करता रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करा.
याशिवाय, कर्जवसुली एजंटच्या अपमानास्पद वागणुकीला सामोरे जाण्यासाठी कर्जदारांकडे कायदेशीर मार्ग आहेत.
कोणत्या उपायांनी तुम्ही वसूली एजंटचा त्रास टाळू शकता ते जाणून घेवूयात…

 

लोन रिकव्हरीसाठी RBI ची गाईडलाईन

रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, लोन रिकव्हरी एजंट वसुलीसाठी धमक्या किंवा छळ करू शकत नाहीत, मग ते तोंडी किंवा शारीरिक असो.
कर्जदाराला वारंवार कॉल करणे किंवा सकाळी 9 वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी 6 नंतर कॉल करणे देखील त्रासदायक श्रेणीत येते.

कर्ज वसुलीसाठी मसल पॉवर वापरणे किंवा धमकी देणे हे छळवणुकीच्या कक्षेत येते.
एवढेच नव्हे तर कर्जदाराचे घर किंवा कामाच्या ठिकाणी न कळवता नातेवाईक,
मित्र किंवा सहकारी कर्मचार्‍यांना धमकावणे आणि त्रास देणे हाही छळ (Harassment) आहे.
धमक्या किंवा अपशब्द वापरणे देखील त्या कक्षेत येते.

 

बँकेवर RBI लावू शकते दंड

कर्ज वसुली एजंट तुम्हाला त्रास देत असल्यास, तुम्ही सर्वप्रथम बँकेकडे तक्रार करणे आवश्यक आहे.
तसेच, बँकेला तुमची परिस्थिती सांगून, तुम्ही कर्ज परतफेडीच्या अटींवर काम केले पाहिजे.

बँकेतील तक्रारीचे 30 दिवसांत निवारण न झाल्यास बँकिंग लोकपालाकडे तक्रार करता येईल. रिझर्व्ह बँकेकडेही तक्रार करता येते.
रिझर्व्ह बँक बँकेला निर्देशास आणून देऊ शकता आणि विशेष प्रकरणांमध्ये आरबीआय दंड देखील करू शकते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ग्राहकाकडे न्यायालयात जाण्याचाही पर्याय

लोन रिकव्हरी एजंटने कोणतीही बेकायदेशीर कारवाई केली, प्राणघातक हल्ला केला किंवा कोणतीही मालमत्ता काढून घेतली,
तर कर्जदार पोलिसांकडे तक्रार करू शकतो.

जर जास्त त्रास दिला गेला असेल तर वकिलाशी संपर्क साधून वसुली एजंटने जो अतिरेक केला आहे जसे की,
चुकीचे पत्र लिहिणे किंवा कोणतीही चुकीची कारवाई करणे तर त्या आधारे न्यायालयातही जाता येते.

कर्जदाराला लोकअदालत आणि ग्राहक न्यायालयात जाण्याचा पर्यायही असतो.

 

Web Title :- RBI Governor On Loan Recovery Agent | complaint against loan recovery agent rbi governor shaktikanta das warns banks financial entities

 

हे देखील वाचा :

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! बॅंक खात्यात जमा होणार लाखो रुपये; वेतनात वाढ ?

Pune Crime | पुण्यात घरफोडीसह वाहनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक, 4.75 लाखाचा मुद्देमाल जप्त

Amol Mitkari On Sadabhau Khot | अमोल मिटकरींचा जोरदार टोला; म्हणाले – “पोट फुटेस्तुवर खाल्ल सदाभाऊ, आता बिलपण द्या”

 

Related Posts