IMPIMP

RBI – Indian Currency Notes | आता मिळणार नाही कापलेली, फाटलेली, घाणेरडी नोट; RBI ने जारी केली गाईडलाईन, करन्सी नोट चेक करण्यासाठी सांगितले ‘हे’ 11 मानक

by nagesh
 RBI - Indian Currency Notes | rbi ask banks to test currency notes sorting machines guidelines for authentication and fitness sorting parameters

नवी दिल्ली : वृत्तसंस्था RBI – Indian Currency Notes | बँकिंग व्यवस्थेत अनेक अनफिट नोटा वापरल्या जात आहेत. यात सुधारणा करण्यासाठी आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नोटांची फिटनेस तपासणी अनिवार्य केली आहे. यासाठी आरबीआयने 11 मानके निश्चित केली आहेत. (RBI – Indian Currency Notes)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

नोटांची फिटनेस मशीन ठेवा
आरबीआयने बँकांना नोटा मोजण्याचे यंत्र वापरण्याऐवजी नोट फिटनेस मशीन वापरण्याचे निर्देश दिले आहेत. आरबीआयने निर्देश दिले आहेत की बँकांनी आपली नोटा मोजणारी मशीन अ‍ॅक्युरसी आणि कन्सिस्टंन्सीच्या बाबतीत प्रत्येक तिमाहीत तपासावी, ज्यामुळे हे समजेल की चलनी नोटा आरबीआयच्या पॅरामीटर्सनुसार योग्य आहेत किंवा नाही.

 

टेप-ग्लूने चिटकवलेल्या नोटा होतील चलनातून बाहेर
अनेक घड्यांमध्ये दुमडलेल्या नोटा, रंग बदललेल्या आणि टेप किंवा गोंदाने चिकटलेल्या नोटाही अयोग्य मानून चलनातुन बाहेर काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (RBI – Indian Currency Notes)

 

चलनावरील डाग
आरबीआयने म्हटले आहे की नोटा घाण होतात, त्या जास्त दुमडल्याने, ओले हात लावल्याने, इत्यादींमुळे खराब होतात. अशा नोटा आता अनफिट समजल्या जातील.

 

अशा नोटाही अनफिट
आरबीआयच्या म्हणण्यानुसार, नोटांच्या सतत वापरामुळे, पेपर नरम होतो, ज्यामुळे त्यावरील मार्क्स नीट ओळखता येत नाहीत. त्यामुळे अशा नोटाही अनफिट आहेत.

 

अशा नोटा मानल्या जातील अनफिट

कोपरे कापलेले डॉग इयर्स चलन

अनेक घड्या घालून दुमडलेल्या नोटा

दुमडल्यामुळे आकार बदलेल्या नोटा

धुतल्यामुळे रंग खराब झालेल्या नोटा

टेप, कागद इत्यादींनी चिकटवलेल्या नोटा

चिन्ह पुसली गेलेल्या नोटा

घाणेरड्या झालेल्या नोटा

किंचित सुद्धा फाटलेल्या नोटा

चिर पडलेल्या, डाग आणि पेनाने काहीही काढलेल्या ई. नोटा

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- RBI – Indian Currency Notes | rbi ask banks to test currency notes sorting machines guidelines for authentication and fitness sorting parameters

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना, प्रेम संबंधातून तरुणीवर ब्लेडने वार

Pune Crime | हौसेसाठी पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

 

 

Related Posts