IMPIMP

RBI पॉलिसीने तुटू शकते शेअर मार्केटचे ’सुरक्षा जाळे’, रिटेल गुंतवणुकदार जाऊ शकतात शेअर बाजारापासून दूर

by nagesh
RBI | kyc process how to video kyc online at home rbi issue guidlines

नवी दिल्ली : वृत्तसंस्थारिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) डेप्युटी गव्हर्नर मायकेल पात्रा यांनी नुकतेच शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना भविष्याबाबत काही इशारे दिले आहेत, जे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. पात्रा यांनी भर दिला की देशांतर्गत अर्थव्यवस्थेला महागाईच्या उच्च पातळीमुळे व्याजदरात काही वाढीचा सामना करावा लागू शकतो. त्याच वेळी, त्यांनी इशारा देखील दिला की मॉनिटरी पॉलीसीची कारवाई ‘वेदनारहित असण्याची शक्यता नाही‘. (RBI)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पात्रा ज्या वेदनांबद्दल बोलत आहेत त्याचा शेअर बाजारावर दुहेरी परिणाम होऊ शकतो. एकीकडे आर्थिक वाढ मंद झाल्यामुळे कंपन्यांच्या उत्पन्नाचा अंदाज कमी होईल. त्याच वेळी, व्याजदरात वाढ झाल्यामुळे, बँका त्यांच्या मुदत ठेवींचे दर देखील वाढवतील, ज्यामुळे गुंतवणूकदारांना शेअर बाजारापासून दूर नेले जाऊ शकते. या दोन कारणांपैकी दुसरे कारण शेअर बाजारासाठी अधिक चिंताजनक असू शकते. (RBI)

 

पाश्चात्य देशांचा असा विश्वास आहे की जर गुंतवणूकदारांना त्यांच्या ठेवींवर मिळणारा वास्तविक व्याजदर सकारात्मक असेल तर तो गुंतवणूकदारांना शेअर बाजारापासून दूर नेतो. मात्र, भारतात असे पुरावे अद्याप मर्यादित आहेत.

 

भारतातील वास्तविक व्याज दर (रेपो दर वजा आर्थिक वर्ष 2023 साठी सरासरी महागाई दर) मायनस 1.8 टक्के आहे. कोरोना महामारीच्या काळात या निगेटिव्ह व्याजदराने केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील गुंतवणूकदारांना जास्त रिटर्न मिळवण्यासाठी शेअर बाजाराकडे वळण्यास प्रोत्साहित केले होते, ज्यामुळे बाजारात तेजी आली.

 

निगेटिव्ह व्याजदर कुटुंबांना हा विचार करण्यास भाग पाडतात की, ते पैसे वाचवून कोठे लावत आहेत. त्याच वेळी, त्यांना जास्त रिटर्नसाठी जोखीम घेण्यास भाग पाडते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आयएमएफच्या मते, गुंतवणूकदार सहसा सामान्य व्याजदरांच्या पलीकडे प्रत्यक्ष महागाई-समायोजित दरांकडे पाहतात आणि त्यावर आधारित त्यांचे गुंतवणूक निर्णय घेतात.
आयएमएफने जानेवारीत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
निगेटिव्ह किंवा कमी वास्तविक व्याजदर गुंतवणूकदारांना अधिक जोखीम घेण्यास प्रोत्साहित करतात.

 

भारतातही, गेल्या काही वर्षांत, बचत आणि मुदत ठेवींवर महागाई-समायोजित नकारात्मक दरांमुळे,
अधिकाधिक कुटुंबे चांगल्या रिटर्नसाठी शेअर बाजाराकडे वळली.
मात्र, आता व्याजदरात वाढ केल्याने गुंतवणूकदारांना बाजारातून बँकांमधील मुदत ठेवी किंवा इतर गुंतवणूक पर्यायांकडे खेचले जाऊ शकते.

 

सुरक्षा भिंत बनले होते किरकोळ गुंतवणूकदार

गेल्या काही महिन्यांपासून परकीय गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात सातत्याने पैसा खेचत आहेत.
परदेशी गुंतवणूकदारांकडून एवढ्या मोठ्या कालावधीत एवढी सतत विक्री बाजाराने क्वचितच पाहिली असेल.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या म्हणण्यानुसार,
किरकोळ गुंतवणूकदार या काळात शेअर बाजारासाठी सुरक्षिततेचे जाळे म्हणून उदयास आले आहेत.
विदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या एका महिन्यात सुमारे 3 लाख कोटी रुपयांची विक्री केली आहे.

हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की कोरोना महामारीपासून,
देशातील डीमॅट खात्यांची संख्या दुप्पट होऊन 9.5 कोटी रुपयांवर गेली आहे आणि या काळात या गुंतवणूकदारांनी बाजारात सुमारे 3 लाख कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक केली आहे.
मात्र, आगामी काळात रिझर्व्ह बँकेच्या धोरणामुळे शेअर बाजाराचे हे ’सेफ्टी नेट’ बाजारापासून दूर होताना दिसत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सकारात्मक वास्तविक व्याजदरांबाबत आरबीआयच्या भूमिकेबद्दल विचारले असता पात्रा म्हणाले,
कुटुंबांनी अर्थव्यवस्थेत सर्वाधिक पैसा लावला. नकारात्मक वास्तविक व्याजदरांमुळे,
मोठ्या संख्येने कुटुंबे शेअर बाजाराकडे वळली होती. आणि आम्हाला ते लवकरच बदलण्याची गरज आहे.

पात्रा यांच्या विधानावरून असे सूचित होते की मध्यवर्ती बँकेला वाटते की,
जास्तीत जास्त कुटुंबांनी त्यांची बचत खर्‍या अर्थव्यवस्थेत गुंतवावी, कंपन्यांच्या शेअर्ससारख्या फायनान्शियल असेटमध्ये नाही.

 

Web Title :- RBI | rbi policy agenda may punch holes in stock market new found safety net

Related Posts