IMPIMP

गृहमंत्री अनिल देशमुखांचा पत्ता कट ?, चर्चेला उधाण

by pranjalishirish
reshuffle in the cabinet of the mva government anil deshmukh will be replaced Sharad Pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून लवकरच राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात फेर बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिला फटका हा गृहमंत्री अनिल देशमुख यांना बसणार आहे. दरम्यान राष्ट्रवादीला अन्य काही मंत्र्यांच्या खात्यात बदल करायचे आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, आजच संबंधित मंत्र्यांना खातेबदलाबद्दल माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे कोणत्या मंत्र्याचे पंख छाटले जाणार आणि कुणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार Sharad Pawar यांच्यात सोमवारी (दि. 15) वर्षा बंगल्यावर बैठक झाली. यावेळी सचिन वाझे प्रकरण तसेच सरकारमधील मंत्रिमंडळ फेरबदला संदर्भात महत्वाची चर्चा झाली. गेल्या वर्षभरापासून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खात्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सुशात सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण ते आताचे सचिन वाझे प्रकरणापर्यंत गृहमंत्री म्हणून देशमुख चोख कामगिरी करू शकले नाहीत, अशी भूमिका महाविकास आघाडीच्या दोन्ही जेष्ठ नेत्यांमध्ये आहे. शिवसेनेचे रिक्त झालेले वन मंत्रालय तसेच राष्ट्रवादीच्या कोट्यातील गृहमंत्रिपदी नवीन मंत्र्यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे. देशमुख हे शरद पवार Sharad Pawar  यांचे विश्वासू सहकारी असले तरी त्यांच्या कामगिरीवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस अंतर्गतही काही फेरबदल होण्याची शक्यता असून या संदर्भात काँग्रेसचे दिल्लीतील ज्येष्ठ नेते निर्णय घेणार असल्याचे समजते.

Also Read : 

भिवंडी महापालिकेच्या सभागृह नेतेपदी कामिनी पाटील

Related Posts