IMPIMP

Ritesh Deshmukh | 16 जणांना डावलून रितेश आणि जेनेलिया देशमुख यांच्या कंपनीला दिला भूखंड, भाजपाने केले गंभीर आरोप

by nagesh
Riteish Deshmukh | mister mummy riteish deshmukh and genelias mr mummy will visit on this day

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन मे. देश अ‍ॅग्रो प्रा.लि. (Desh Agro Pvt. Ltd.) ही अभिनेते रितेश विलासराव देशमुख (Ritesh Vilasrao Deshmukh) आणि जेनेलिया रितेश देशमुख (Genelia Ritesh Deshmukh) यांची भागीदारीतील कंपनी आहे. या कंपनीला लातूर एमआयडीसीमध्ये (Latur MIDC) प्रतीक्षा यादीत असलेल्या 16 उद्योजकांना डावलून भूखंड देण्यात आला. तसेच लातूर जिल्हा बँकेकडून (Latur District Bank) 116 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले, असा आरोप भाजपाने (BJP) केला आहे. मात्र, भाजपाने केलेल्या या आरोपावर अद्याप रितेश आणि जेनेलिया देशमुख किंवा इतर देशमुख कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भाजपाचे लातूर शहरप्रमुख गुरुनाथ मगे (Gurunath Mage) यांनी हे आरोप केले आहेत. गुरुनाथ मगे यांनी म्हटले की, जेव्हा त्या 16 लोकांपैकी काहीजण मला भेटले तेव्हा त्यांनी, आता भाजपाची सत्ता आली आहे, आमच्यावर अन्याय झाला. त्याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे, असा प्रश्न केला. त्यानंतर आम्ही माहिती मिळवली. त्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती आम्ही लोकांसमोर मांडत आहोत. 16 उद्योजकांना डावलून रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि जेनेलिया देशमुख यांना भूखंड देण्यात आला. सत्तेचा गैरवापर करून त्यांनी भूखंड मिळवला आहे, असा माझा आरोप आहे. तसेच या प्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सहकारमंत्र्यांकडे आम्ही तक्रार करणार आहोत.

 

मे. देश अ‍ॅग्रो प्रा.लि. कंपनीची स्थापना 23 मार्च 2021 रोजी झाली.
कंपनीत रितेश आणि जेनेलिया यांची 50 टक्के भागीदारी आहे.
कंपनीकडे साडे सात कोटी रुपयांचे भाग भांडवल असून कंपनीने 5 एप्रिल 2021 रोजी भूखंडासाठी एमआयडीसीकडे अर्ज केला होता.
त्याला 15 एप्रिल 2021 रोजी मंजुरी देण्यात आली.

 

भाजपाने आरोप केला आहे की, इतक्या जलद पद्धतीने प्रतीक्षा यादीतील 16 जणांना डावलून भूखंड कसा काय दिला.
तसेच लातूर जिल्हा बँकेत कर्जासाठी अर्ज केल्यावर तब्बल 116 कोटी रुपयांचे कर्जही देण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणी रितेश आणि जेनेलिया देशमुख यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ritesh Deshmukh | riteish deshmukh genelia deshmukh in trouble bjps serious allegations against his company over plots and loans

 

हे देखील वाचा :

Pune Crime | हडपसर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकाला न्यायालयाचा दणका, कारणे दाखवा नोटीस; जाणून घ्या प्रकरण

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीची ईडी आणि सीबीआय चौकशीसाठी जनहित याचिका दाखल, आदित्य ठाकरे म्हणाले…

Pune Crime | पादचार्‍यांना लुटण्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद; स्वारगेट परिसरातील घटना

 

Related Posts