IMPIMP

Rotomac पेन बनवणाऱ्या कंपनीने लावला बँकांना ७५० कोटींचा चुना

by nagesh
Rotomac | cbi books rotomac global its directors for rs 750 crore alleged fraud in indian overseas bank officials crime fraud

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – कानपूरस्थित रोटोमॅक ग्लोबल (Rotomac) आणि तिच्या संचालकांविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने (CBI) बुधवारी 16 नोव्हेंबर रोजी इंडियन ओव्हरसीज बँकेच्या (Indian Overseas Bank)
सांगण्यावर हा दाखव करण्यात आला आहे. एकूण ७५०. ५४ कोटी रुपयेच्या फसवणुकीचा गुन्हा रोटोमॅक कंपनीवर (Rotomac) करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रोटोमॅक ग्लोबल (Rotomac) ही देशातील अग्रगण्य पेन उत्पादक (Pen Manufacturers) कंपनी आहे. या कंपनीकडे बँक ऑफ इंडियाच्या (Bank Of India) नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाचे सुमारे 2,919 कोटी रुपये थकीत आहेत. या थकबाकीमध्ये 23 टक्के हिस्सा इंडियन ओव्हरसीज बँकेचा (IOB) आहे. सीबीआयने कंपनी, तिचे संचालक साधना कोठारी आणि राहुल कोठारी यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 120-बी आणि 420 अनुवये फसवणुकीचा (Financial Fraud) गुन्हा दाखल केला आहे. या व्यतिरिक्त भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध तरतुदींनुसारचा ही समावेश केला आहे.

 

कंपनीने बँकेची फसवणूक केली आणि पैशांची हेराफेरीही केल्याचे बँकेने म्हटले आहे.
यामुळे कंपनीने चुकीच्या पद्धतीने 750.54 कोटी रुपयांचा लाभ मिळवला आणि बँकेला आर्थिक नुकसान झाले.
या रकमेची वसूली होऊ शकत नसल्याचंही बँकेने म्हटलेय. बँकेने २०१२ साली कंपनीला ५०० रूपयांचे नॉन फंड बेस्ड
क्रेडिट लिमिट दिले होते. याची थकबाकी २०१६ साली ७५०. ५४ कोटी रुपये झाली.
त्यानंतर खाते नॉन परफॉर्मिंग ऍसेट जाहीर करण्यात आले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Rotomac | cbi books rotomac global its directors for rs 750 crore alleged fraud in indian overseas bank officials crime fraud

 

हे देखील वाचा :

Rahul Gandhi | ‘अभिनेत्रीला एक महिना तुरुंगात ठेवलं जात असेल तर राहुल गांधींना अटक केली पाहिजे’; सावरकरांचे पणतू रणजित सावरकरांची मागणी

Uddhav Thackeray | ज्यांचा स्वातंत्र्यलढ्याशी काडीमात्र संबंध नाही, त्यांच स्वातंत्र्यवीरांबद्दलचे प्रेम हास्यास्पद; उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना चोख प्रतिउत्तर

Nysa Devgan | न्यासा देवगणने ‘अशाप्रकारे’ केले तिचे ट्रान्सफॉर्मेशन, काजोलने सांगितले ‘हे’ ब्युटी सीक्रेट

 

Related Posts