IMPIMP

Rupali Chakankar | चित्रा वाघ यांच्या आरोपांना रुपाली चाकणकरांचे प्रत्युत्तर, म्हणाल्या- ‘महिला आयोगाने…’

by nagesh
Rupali Chakankar | rupali chaakankar replied chitra wagh after allegation to issue notice to tejaswini pandit urfi javed

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  अभिनेत्री उर्फी जावेद (Actress Urfi Javed) आणि चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यात सुरु असलेला वाद मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. उर्फी जावेद परिधान करत असलेल्या कपड्यांवरुन तिच्यावर कारवाई करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. याप्रकरणी त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन महिला आयोगावर (State Commission for Women) निशाणा साधला होता. महिला आयोगाने अनुराधा वेबसिरीजच्या पोस्टरवरुन तेजस्विनी पंडितला नोटीस पाठवली होती. परंतु उर्फी जावेदला जाणीवपूर्वक नोटीस पाठवली नसल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला. चित्रा वाघ यांच्या आरोपांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी पत्रकार परिषद घेऊन तेजस्विनी पंडीतला पाठवलेल्या नोटीसीबाबत स्पष्टीकरण दिले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) म्हणाल्या, काल चित्रा वाघ यांनी माध्यमांना खोटी माहिती दिली.
अनुराधा वेबसिरीजच्या पोस्टरवरुन राज्य महिला आयोगाने तेजस्विनी पंडीतला (Tejaswini Pandit) नोटीस पाठवलेली नाही. याबाबत आम्ही अनुराधा वेबसिरीजचे (Anuradha Web Series) दिग्दर्शक संजय जाधव (Sanjay Jadhav) यांना नोटीस पाठवली असल्याची माहिती चाकणकर यांनी यावेळी दिली.

आम्हाला प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे ही नोटीस पाठवली असून दिग्दर्शक म्हणून तुमची भूमिका स्पष्ट करावी,
असे निर्देश या नोटीसद्वारे देण्यात आले असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.
तसेच नोटीसला संजय जाधव यांनी आयोगाला उत्तर दिले आहे.
मात्र, यादरम्यान कुठेही तेजस्विनी पंडितचा उल्लेख नव्हता, असे स्पष्टीकरण रुपाली चाकणकर यांनी दिले.

 

Web Title :- Rupali Chakankar | rupali chaakankar replied chitra wagh after allegation to issue notice to tejaswini pandit urfi javed

 

हे देखील वाचा :

Railway Bharti | राज्यातील दहावी पास तरूणांसाठी सेंट्रल रेल्वेकडून मोठे गिफ्ट; २४२२ जागांसाठी लवकरच होणार भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची पध्दत

Ajit Pawar | पुण्यात अजित पवारांच्या हस्ते दुचाकींना ‘स्वराज्यरक्षक संभाजी महाराज’ आशयाचे स्टिकर

MP Sanjay Raut | ‘नारायण राणे माझ्या नादाला लागू नकोस, तुझ्यासारखे…’, नारायण राणेंचा एकेरी उल्लेख करत संजय राऊतांचा घणाघात

 

Related Posts