IMPIMP

Russia Ukraine War | गोठविणार्‍या थंडीत 10 किमीचा पायी प्रवास करुन गाठले रोमानिया; युक्रेनमधून पुण्यातील 9 विद्यार्थीनी सुखरुप परतल्या

इतर विद्यार्थीही परतीच्या मार्गावर, मुलींना पाहून कुटुंबियांना कोसळले रडू

by nagesh
Russia Ukraine War | Reached Romania after a 10 km trek in the freezing cold 9 students from Pune returned safely from Ukraine

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनRussia Ukraine War | युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीत अडकलेले पुण्यातील (Pune) ९ विद्यार्थ्यांसह नगर (Ahmednagar), सोलापूरमधील (Solapur) विद्यार्थी सुखरुप घरी परतले असून इतर विद्यार्थीही परतीच्या मार्गावर आहेत. भारतात परत येण्यासाठी त्यांना रोमानिया येथे जावे लागले. युक्रेनची सीमा ते रोमानियाची (Ukraine To Romania) सीमा दरम्यान तब्बल १० किलोमीटरची पायपीट काही जणांना करावी लागली. (Russia Ukraine War)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पुण्यातील १०० हून अधिक विद्यार्थी युक्रेनला शिक्षणासाठी गेले आहेत. त्यापैकी पुणे व सोलापूर येथील ९ विद्यार्थीनी रविवारी सायंकाळी पुण्यात पोहचल्या. तसेच अहमदनगरमधील २ विद्यार्थी घरी सुखरुप पोहचले. लोहगाव विमानतळावरुन बाहेर आलेल्या आपल्या मुलींना पाहून कुटुंबियांना आनंदाश्रु अनावर झाले.

 

रशियाने पुकारलेल्या युद्धांमुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारत सरकारने मिशन गंगा हे अभियान सुरु केले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनी रोमानिया बॉर्डरवर गर्दी केली आहे. ज्यांचा संपर्क दुतावासाशी झाला आहे. त्यांना रोमानियामधून सुखरुप मायदेशी परत आणले जात आहे. (Russia Ukraine War)

 

दिल्ली आणि मुंबई येथे रोमानिया येथून दोन विमानांद्वारे विद्यार्थी परतले आहेत. श्रद्धा शेटे, सुप्रिया खातकळे, रोशन, गुंजाळ, अंकिता शहापुरे, सिद्धी नाईक, सुष्मिता राठोड, सलोनी गेंगाणे, निधी जगताप, श्रुती लोहकरे या ९ विद्यार्थीनी दिल्लीहून रविवारी सायंकाळी लोहगाव विमानतळावर आल्या.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत सोलापूरची अंकिता शहापुरे म्हणाली, युक्रेनच्या बॉर्डरवर सुमारे ३ हजार विद्यार्थी अडकलेले आहेत.
अनेकांना जेवण व पिण्याचे पाणीही मिळत नाही.
आम्ही थांबलेल्या ठिकाणी रशियाने गोळीबार केला होता.
त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. मायदेशात परतल्याचा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही.

 

युक्रेनमधून विद्यार्थ्यांना बसमधून रोमानियाच्या सीमांपर्यत नेले जाते.
गोठवणार्‍या थंडीत या सीमेपासून १० किलोमीटर प्रवास पायी करावा लागतो.
रोमानियात जाताना विद्यार्थ्यांना अडथळ्यांचा सामना करावा लागतो. सीमेवरील गेट उघडण्याची प्रतिक्षा देखील बराच वेळ करावी लागते.
त्यानंतर पुन्हा विद्यार्थ्यांना वाहनांमधून ८ तासांचा प्रवास करुन विमानतळावर आणले जाते.
तेथून ते मायदेशी परतले आहेत.
आम्हाला मायदेशात परत आणण्यात केंद्र सरकार व युक्रेन सरकारकडूनही मदत झाली.
आता आम्ही सुखरुप घरी परतलो असल्याचे पुण्यातील निधी जगताप हिने सांगितले.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

युक्रेनमधील बुकोविनीयन विद्यापीठात शिकणारा भरत तोडमल हा रविवारी रात्री अहमदनगरला पोहचला़ तेव्हा नातेवाईक व स्थानिकांनी फुले उधळून स्वागत केले.
भरत तोडमल याने सांगितले की, बुकोविनीयन विद्यापीठातील भारतीय विद्यार्थ्यांना शुक्रवारी रोमानिया बॉर्डरपर्यंत भारतीय दूतावासाच्या बसेसने सोडण्यात आले़ तेथून रोमानियाची राजधानी बुकारेस्ट येथे विद्यार्थ्यांना पाठविण्यात आले़.
बुकारेस्टमधून विमानाद्वारे आम्ही सर्व विद्यार्थी शनिवारी रात्री मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) दाखल झालो़.
आम्हा सर्व विद्यार्थ्यांचा प्रवास व इतर खर्चाची व्यवस्था भारतीय दूतावासाने केली होती़.

 

Web Title :- Russia Ukraine War | Reached Romania after a 10 km trek in the freezing cold 9 students from Pune returned safely from Ukraine

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात अवैध धंदे चालु देण्यासाठी गुन्हे शाखेतील पोलिस अधिकारी-अंमलदार Protection Money स्वरूपात पैसे स्विकारताहेत; अति वरिष्ठांनी करून दिली मुंबईतील व.पो.नि. विरूध्दच्या खंडणीच्या गुन्ह्याची आठवण

Pune Crime | फरशी साफ करण्याचे लिक्वीड पाजून विवाहितेला जीवे मारण्याचा प्रयत्न; कोंढव्यातील खळबळजनक घटना

7th Pay Commission DA Hike | केंद्रीय कर्मचार्‍यांचा 14% वाढणार DA, झाले कन्फर्म ! इतकी वाढेल सॅलरी

 

Related Posts