IMPIMP

सचिन वाझे यांच्या अडचणीत आणखी वाढ ! संपत्तीची होणार चौकशी

by pranjalishirish
Sachin Vaze | sachin waze ed money laundering case sachin waze granted bail but stay in jail due to other cases

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – सचिन वाझे यांच्याबाबत दररोज नवीन नवीन खुलासे पुढे येत असून स्कॉपिओतून बाहेर पडलेली ती व्यक्ती सचिन वाझेच sachin vaze असल्याचा मोठा खुलासा झाला होता. ते पीपीई किट नसून जॅकेट असल्याची माहिती एनआयएच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. दरम्यान, सचिन वाझे हे वापरत असलेली मर्सिडीज कार एनआयएने काल रात्री जप्त केली. ही मर्सिडीज कार मुंबई पोलीस आयुक्तालयात पार्क केलेली असायची. काळ्या रंगाच्या या मर्सिडीज कार (एमएच ५ बीआर १०९५) मध्ये ५ लाख रुपये रोख व नोटा मोजण्याचे मशीन मिळाले आहे. तसेच डिकीमधील एका पिशवीत चेक्सचा शर्ट, नंबरप्लेट व डायरी सापडली आहे. त्यात सापडलेली नंबरप्लेट आहे ती स्कॉपिओला वापरण्यात आली होती. पीपीई किट घातलेल्या व्यक्तीने घातलेले लाल रंगाचे चेक्सचे टि शर्ट घातलेले दिसून येते. तेच टि शर्ट या मर्सिडीजमध्ये मिळाले असल्याची माहिती एनआयएचे विशेष महानिरीक्षक अनिल शुक्ला यांनी दिली.

ही मर्सिडीज कार धुळे येथील साारांश भावसार यांची असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांनी आपण ही कार जानेवारीत कार २४ या वेबसाईटवरुन ऑनलाइन विक्री केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कार विकत घेणार्‍या दुसर्‍या पार्टीबद्दल आपल्याला काही माहिती नाही, असे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, सचिन वाझे sachin vaze हे वापरत असलेल्या गाड्या, त्यांचे मुळ मालक, तसेच त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यास राज्य शासनाने सुरुवात केली आहे. त्यांच्याकडे इतक्या महागड्या गाड्या खरेदी करण्यासाठी पैसा कोठून आला याची चौकशी होणार आहे.

Also Read :

भाजप खासदाराचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्या केल्याचा संशय

Related Posts