IMPIMP

Sadabhau Khot On Shivsena | ‘भाजपामुळे सेना 25 वर्षे जगली’ – सदाभाऊ खोत

by nagesh
Sadabhau Khot | sadabhau khot criticizes shiv sena mp sanjay raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Sadabhau Khot On Shivsena | भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यात सतत कोणत्याही विषयावरुन वाद विवाद होताना दिसत असतात. त्याचबरोबर परस्पर टीका टीपणी देखील त्याच पद्धतीने दिसते. अशातच भाजप पुरस्कृत आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. सदाभाऊ खोत यांनी ट्विट करुन शिवसेनेला डिवचलं आहे. (Sadabhau Khot On Shivsena)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सदाभाऊ खोत यांनी काल (सोमवारी) चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi Government) धोरणांसह पवार कुटुंबीयांवार जोरदार टीका केली. त्याचबरोबर, महागाईवरही भाष्य केलं होतं. ”कशाची महागाई आली हो, 20 हजाराचे सोनं 50 हजार तोळा झालं तरी लोक घेतात ना ? तेव्हा महागाई दिसत नाही, देशी क्वार्टर आता 150 ते 200 रुपयांना मिळायला लागली आहे. मग, महागाई नाही वाढली का ? महागाई झाली तरी लोकं दारू पिणं सोडता का ? कांदा डाळींच्या किंमती वाढल्यास शेतकरी सुखी होईल.” असं ते म्हणाले. (Sadabhau Khot On Shivsena)

 

 

दरम्यान, ”भाजपामुळे सेना 25 वर्षे जगली, महाविकास आघाडीच्या साथीने 3 वर्षात संपली”, असे ट्विट सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. सदाभाऊ यांनी शिवसेनेवर खोचक शब्दात टिका केली असून महाविकास आघाडीसोबत गेल्याने शिवसेना पक्षाचे वर्चस्व कमी झाल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, जशा महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येतील, तसेच कोरोनाची पुढली राजकीय लाट पण येईल. राजकीय स्वार्थासाठी कोरोनाच्या लाटेचा फायदा करुन घेणाऱ्या सरकारकडून काही अपेक्षा नाही,” असं ट्विटवरुन हल्लाबोल केला आहे.

 

Web Title :- Sadabhau Khot On Shivsena | because of bjp the army has survived for 25 years sadabhau khotan slammed shiv sena

 

हे देखील वाचा :

Pune Crime | विनयभंग करणाऱ्या आरोपीला चंदननगर पोलिसांकडून शेगाव येथून अटक

Gold Price Today | दोन महिन्यात सोन्याच्या दरात 5000 रुपयांची घसरण, 47,161 रूपयात मिळतंय 10 ग्रॅम

MNS on Shivsena | मनसेचा शिवसेनेवर हल्लाबोल; म्हणाले – ‘शिवसेनेनं त्यांचा धनुष्यबाण काँग्रेस, राष्ट्रवादीकडे गहाण ठेवल्याने…’

Related Posts