IMPIMP

Sangli Accident News | भरधाव कार रसवंतीगृहात घुसल्याने शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू

by nagesh
Sangli Accident News | school boy died on the spot after a speeding car rammed directly into raswantigruh in palus taluka sangli

सांगली : सरकारसत्ता ऑनलाईन  सांगली (Sangli Accident News) जिल्ह्यात पलूस तालुक्यातील खंडोबाचीवाडी या ठिकाणी एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये भरधाव कार थेट रसवंतीगृहाच्या शेडमध्ये घुसल्याने एका शाळकरी विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. समर्थ संतोष शिंदे Samarth Santosh Shinde (वय 11) असे या अपघातात मृत पावलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. रविवारी हा अपघात झाला आहे. या प्रकरणी भिलवडी पोलिस ठाण्यात (Bhilwadi Police Station) नोंद करण्यात आली आहे. या अपघातानंतर (Sangli Accident News) कार चालक  घटनास्थळावरून फरार झाला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय घडले नेमके?
तासगांव भिलवडी रोडवर खंडोबाचीवाडीत (Khandobachiwadi) नायरा पेट्रोल पंपाजवळ असणाऱ्या शेताच्या कडेला संतोष गोपाळ शिंदे (Santosh Gopal Shinde) यांचे रसवंतीगृह आहे.
या रसवंतीगृहात संतोष शिंदे यांचा मुलगा समर्थ बसला होता.
यादरम्यान भिलवडी स्टेशनकडून भरधाव वेगाने जाणारी सियाज कार (एमएच-10-सीएक्स-4081)
अचानक रसवंती गृहाच्या शेडमध्ये घुसली. हि कार एवढ्या वेगात होती कि ती रसवंती गृहाचे पत्र्याचे शेड उचकटून शेतामध्ये कोसळली.

 

या कारने रसवंतीगृहात बसलेल्या समर्थला फरफटत नेले. यादरम्यान गाडीच्या पुढच्या चाकाखाली आल्याने
समर्थचा जागीच मृत्यू झाला. समर्थ हा खंडोबाचीवाडी विद्यालयात इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत होता.
अपघातानंतर ग्रामस्थांची होणारी गर्दी पाहून आरोपी कार चालक घटनास्थवरून फरार झाला.
या अपघाताप्रकरणी भिलवडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिलवडी पोलिस आरोपी कारचालकाचा शोध घेत आहेत.

 

 

Web Title :   Sangli Accident News | school boy died on the spot after a speeding car rammed directly into raswantigruh in palus taluka sangli

 

हे देखील वाचा :

Shahid Hemu Kalani | भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत अमर शहीद हेमू कलानी यांचे अभूतपूर्व योगदान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra State Skills University | महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, पनवेल आयटीआय इमारतीचे राज्यपालांच्या हस्ते होणार भूमीपूजन

Pune Crime News | कॅनडातील मुलाच्या बनावट सह्या करुन डॉक्टर महिलेची जमीन हडपली; बारामतीमधील प्रकार

 

Related Posts