IMPIMP

Sangli Crime News | खळबळजनक ! सांगली जिल्यातील एकाच कुटुंबातील 9 जणांच्या आत्महत्या प्रकरणी 25 जणांवर गुन्हा, जाणून घ्या प्रकरण

by nagesh
Sangli Crime News | 25 charged 11 detained in sangli mass suicide case nine people in the family commits suicide in mhaisal village miraj sangli

सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन Sangli Crime News | सांगलीच्या मिरज तालुक्यातील म्हैसाळमधील एकाच घरातील नऊ जणांच्या आत्महत्येची (Suicide) धक्कादायक घटना (Sangli Crime News ) सोमवारी घडली. यामुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. म्हैसाळमधील अंबिकानगर भागातील एका घरात नऊ जणांचे मृतदेह आढळले. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे. संबधित आत्महत्या प्रकरणी 25 जणांवर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात (Miraj Rural Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती समोर आली आहे. यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. ताब्यात घेतलेले हे अकरा जण छोटे-मोठे सावकार आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

काल म्हैसाळमधील दोन सख्ख्या भावाच्या कुटुंबातील 9 जणांचे मृतदेह आढळून आले होते. सांगलीतील मिरज परिसरात राहणाऱ्या या दोन सख्ख्या भावांच्या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली. अशी प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तसेच या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या मृतांमध्ये 4 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश आहे. एका खोलीत 3 मृतदेह तर दुसऱ्या खोलीत 6 मृतदेह सापडले. (Sangli Crime News)

 

पोपट यल्लापा वनमोरे (Popat Yallapa Vanmore) (वय 52), संगीता पोपट वनमोरे (Sangeeta Popat Vanmore) (वय 48), अर्चना पोपट वनमोरे (Archana Popat Vanmore) (वय 30), शुभम पोपट वनमोरे (Shubham Popat Vanmore) (वय 28), माणिक यल्लापा वनमोरे (Manik Yallapa Vanmore) (वय 49), रेखा माणिक वनमोरे (Rekha Manik Vanmore) (वय 45), अनिता माणिक वनमोरे (Anita Manik Vanmore) (वय 28), आदित्य माणिक वनमोरे (Aditya Manik Vanamore) (वय 15), अक्काताई वनमोरे (Akkatai Vanmore) (वय 72) अशी आत्महत्या केलेल्याचे नावे आहेत.

 

सध्या या सर्व मृतदेहांसोबत कोणतीही सुसाईड नोट न मिळाल्याने कर्जबाजारी होऊन
या 2 भावांच्या कुटुंबीयांनी ही सामूहिक आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान आर्थिक, सावकारीच्या जाचातून वनमोरे कुटुंबाने आत्महत्या केल्याचा संशय असला
तरी सुशिक्षित कुटुंबाने व्याजाने पैसे घेऊन नेमके कुठे गुंतवले? याचाही पोलिसांना उलगडा करावा लागणार आहे.
दरम्यान, आत्महत्या प्रकरणी स्थानिक पोलीस तपास करत आहेत. ही सामूहिक आत्महत्या आहे की अन्य कारणे आहेत याचाही तपास सुरु आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Sangli Crime News | 25 charged 11 detained in sangli mass suicide case nine people in the family commits suicide in mhaisal village miraj sangli

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Maharashtra Monsoon Update | राज्यातील काही भागात पावसाची दमदार हजेरी; आजही मुंबई, पुण्यात पावसाची रिपरिप सुरूच

Maharashtra Monsoon Update | राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा जोर; मुंबईसह कोकणाला ऑरेंज अलर्ट – IMD

 

Related Posts