IMPIMP

Sanjay Raut | अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबाबत संजय राऊतांचं मोठ विधान; म्हणाले – ‘शरद पवार दबावात नव्हते’

by nagesh
Sanjay Raut | shivsena leader and mp sanjay rauts says wow the transformation of ray yogi and bhogi

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन Sanjay Raut | राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्न नाही. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेणे हे चुकीचे होते. घाईघाईने निर्णय घेतला गेला. त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नाहीत. तर ‘शरद पवार (Sharad Pawar) हे याबाबत दबावात नव्हते,’ असं स्पष्टंच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितलं. त्यावेळी त्यांनी नागपुरात माध्यमांशी संवाद साधला.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याबाबत उत्तर देताना अनिल देशमुख यांच्याबद्दल नवा खुलासा केला आहे. ते म्हणाले, ”शंभर कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. पंरतु, अलीकडे आयोगाने त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नसल्याचे समोर आले आहे. नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्न नाही. अनिल देशमुख यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेणे हे चुकीचे होते. घाईघाईने निर्णय घेतला गेला झाला. त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नाहीत. शरद पवार हे याबद्दल दबावात नव्हते,” असं राऊत म्हणाले.

 

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, ”राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांचे मागच्या काही वर्षात मुस्लिम समाजाबद्दल जे वक्तव्य केले आणि संघाने स्वत: मुस्लीम समाजासाठी राष्ट्रीय मुस्लिम विचार मंचची स्थापना केली. त्यामुळे पडळकर किंवा भाजप नेते ­­मोहन भागवत यांना जनाब म्हणून उल्लेख करतील का? असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

‘दहशत शब्द आमच्या डिक्शनरीमध्ये नाही. शिवसेना असा पक्ष आहे, तिथे हे शब्द चालत नाही.
खोटे आरोप करणे हा बॉम्ब आहे का? मी ईडीच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचं 13 पानी पुराव्यासह सांगितलं.
पंतप्रधान मोदींकडे तक्रार केली. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती दिली आहे.
तो बॉम्ब नाही का? असं देखील राऊत यांनी म्हटलं आहे,

 

Web Title :- Sanjay Raut | NCP Chief sharad pawar was not under pressure regarding anil deshmukhs resignation say sanjay raut

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | … मग मोहन भागवतांचा उल्लेख ‘जनाब’ करणार का ? राऊतांचा भाजपला परखड सवाल

Gopichand Padalkar | ‘शरद पवारांनी राहुल गांधींची जी अवस्था केली, तशीच संजय राऊतांना आदित्य ठाकरेंची करायचीय’ – गोपीचंद पडळकर

Anil Parab | एसटी संपासंदर्भात राज्य सरकारच्या धोरणाबाबत परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले…

 

Related Posts