IMPIMP

Sanjay Raut | … मग मोहन भागवतांचा उल्लेख ‘जनाब’ करणार का ? राऊतांचा भाजपला परखड सवाल

by nagesh
Sanjay Raut | so will you call mohan bhagwat to janab shivsena leader and mp sanjay raut slap to bjp

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइनMIM ने राज्यातील महाविकास आघाडीसोबत (Maha Vikas Aghadi) युती (Alliance) करण्याची ऑफर दिल्यानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. यावरुन भाजपने (BJP) शिवसेनेवर (Shivsena) टीका करत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेलं असल्याची टीका केली होती. या टीकेला खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. तसेच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना परखड सवाल केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Sarsanghchalak Mohan Bhagwat) यांचे मागच्या काही वर्षात मुस्लिम समाजाबद्दल (Muslim Community) जे वक्तव्य केले आणि संघाने स्वत: मुस्लिम समाजासाठी राष्ट्रीय मुस्लिम विचार मंचची स्थापना केली.
त्यामुळे गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि भाजप नेते मोहन भागवत यांना जनाब म्हणून उल्लेख करतील का ? असा परखड सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
शिव संपर्क अभियानाच्या (Shiva Sampark Abhiyan) निमित्ताने संजय राऊत (Sanjay Raut) हे नागपूरच्या (Nagpur) दौऱ्यावर आले आहेत.
त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

 

पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशानुसार पक्षाचे सर्व खासदार (MP) विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाड्यामध्ये (Marathwada) जिल्हानिहाय शिव संपर्क अभियानासाठी फिरत आहेत.
माझ्यावर नागपूरची जबाबदारी आहे. संपूर्ण विदर्भामध्ये पक्ष वाढवण्यासाठी माझा दौरा आहे.
आमचा पक्ष वाढवण्यासाठी आम्हाला अधिकार आहे. सत्ता येते आणि जाते, पण पक्ष हा मोठा असतो.
सध्या अधिवेशन (Session) सुरु आहे. त्यामुळे नागपूरमधील प्रमुख नेते मुंबईत आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

महाविकास आघाडी सरकार असले तर शिवसेना प्रमुख राजकीय संघटना आहे. संघटन ही शिवसेनेची खरी ताकद आहे.
सत्ता असते सत्ता नसते. राजकारणात चढउतार येत असतात. गेल्या 50 वर्षापासून शिवसेना राजकारणामध्ये टिकून आहे.
काम करत आहे. ती फक्त मजबूत संघटनेच्या आधारावर आहे, संघटना ही शिवसेनेची ताकद आहे.
शिवसेनेबाबात समज गैरसमज जे पसरवले जातात त्याबद्दल जनतेत जाऊन ते सांगावे यासाठी हे अभियान असल्याचे आणि शिवसेनेचे विदर्भात कमी झालेले आमदार (MLA) वाढवणे हा या मागचा उद्देश असल्याचे राऊत यांनी सांगितले.

 

भावना गवळी (Bhavana Gawali) या पक्ष परवानगी घेऊन ते अभियानापासून दूर आहेत.
ईडीचा (ED) ससेमिरा लावला आहे. त्यांना कोर्टात हजर राहणे गरजेचं आहे.
त्यामुळे त्या येऊ शकल्या नाही, पण त्या पक्षात सक्रिय असल्याचे राऊत यांनी सांगितले.

 

Web Title :- Sanjay Raut | so will you call mohan bhagwat to janab shivsena leader and mp sanjay raut slap to bjp

 

हे देखील वाचा :

Gopichand Padalkar | ‘शरद पवारांनी राहुल गांधींची जी अवस्था केली, तशीच संजय राऊतांना आदित्य ठाकरेंची करायचीय’ – गोपीचंद पडळकर

Anil Parab | एसटी संपासंदर्भात राज्य सरकारच्या धोरणाबाबत परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले…

Jalgaon Crime | खळबळजनक ! अल्पवयीन मुलीला पळवून नेत कारमध्ये केला बलात्कार

 

Related Posts