IMPIMP

Sanjay Raut on Devendra Fadnavis | ‘मराठी माणसांच्याही मर्सिडीज असायला पाहिजेत, पण कष्टाच्या; चोरीच्या नको’ – संजय राऊत

by nagesh
Sanjay Raut on Devendra Fadnavis | Shivsena MP and leader sanjay raut there should be a mercedes for marathi people but not for hard work and theft

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Sanjay Raut on Devendra Fadnavis | बाबरी मशिदीच्या (Babri Masjid) पतनावरून शिवसेना आणि भाजपमध्ये (Shivsen-BJP) जोरदार कलगीतुरा पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) एकमेकांना प्रतिटोले लगावले होते. अशातच यासंदर्भात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शिवसेनेचा प्रवास असाच आहे गल्ली ते दिल्ली, नाशिक, मुंबई, ठाणे आणि पुणे (Nashik, Mumbai, Thane, Pune) या शहरांच्या गल्लींमधूनच शिवसेना ही दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. या गल्लीत कोणी मर्सिडिज (Mercedes-Benz) चोर नसावेत, आमच्याही मर्सिडिज आहेत. मराठी माणसांच्या मर्सिडीज असायला पाहिजेत. पण, त्या कष्टाच्या चोरीच्या नको, असं म्हणत राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना नाव न घेता टोला लगावला आहे. (Sanjay Raut on Devendra Fadnavis) पुण्यातील (Pune) एका कार्यक्रमात ते बोलत होते.

 

काय आहे मर्सिडिज वाद ?
बाबरी मशिदीच्या पतनावेळी मी स्वत: तिथे होतो मात्र एकही शिवसैनिक तिथे नसल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
त्याला प्रत्युत्तर देताना, देवेंद्र फडणवीस 1857 च्या लढ्यातही सहभागी असतील, असा टोला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लगावला होता.
यावर फडणवीसांनीही प्रतिटोला लगावला होता.
देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंचा ‘मर्सिडीज बेबी’ म्हणून उल्लेख केला होता.

 

तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या मर्सिडीज बेबींनी ना संघर्ष केला आहे, ना संघर्ष पाहिला आहे.
त्यामुळे कारसेवकांच्या संघर्षाची थट्टा ते उडवू शकतात. आमच्यासारखे जे लोक बाबरी पाडताना उपस्थित होते त्यांना आजही गर्व असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं होतं.

 

 

Web Title :- Sanjay Raut on Devendra Fadnavis | Shivsena MP and leader sanjay raut there should be a mercedes for marathi people but not for hard work and theft

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी वाढ; जाणून घ्या मुख्य शहरातील दर

Yoga For Menstrual Cramps | ‘ही’ 3 योगासन तुम्हाला देतील मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम; जाणून घ्या

Pune Crime | महिला मंडल अधिकाऱ्याला जेलमध्ये टाकण्याची धमकी, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकासह तीन जणांवर FIR

 

Related Posts