IMPIMP

Pune Crime | महिला मंडल अधिकाऱ्याला जेलमध्ये टाकण्याची धमकी, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकासह तीन जणांवर FIR

by nagesh
 Pune Crime News | A case has been filed against the moneylender who demanded 55 thousand even after returning 2.5 lakh on 50 thousand, FIR in Chandannagar police station

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | विरोधात निकाल दिल्याच्या रागातून राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाने (Former NCP Corporator) महिला मंडल अधिकाऱ्याला (Woman Circle Officer) अ‍ॅट्रॉसिटीचा (Atrocity Act) गुन्हा (FIR) दाखल करुन जेल मध्ये टाकण्याची धमकी (Threat) दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक काळुराम मारुती पवार (Kaluram Maruti Pawar) यांच्यासह अशोक किसनराव बहिरवाडे (Ashok Kisanrao Bahirwade), सागर बहिरवाडे (Sagar Bahirwade) यांच्यावर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात (MIDC Bhosari Police Station) सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत महिला मंडल अधिकाऱ्याने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अशोक बहिरवाडे (रा. गवळीवाडा, चिंचवड स्टेशन – Chinchwad Station), काळुराम मारुती पवार, सागर बहिरवाडे (रा. गवळीवाडा, चिंचवड स्टेशन) यांच्याविरुद्ध आयपीसी 353, 341, 506, 6,3 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार गुरुवारी (दि.5) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास लांडेवाडी येथील मंडल अधिकारी कार्यालयाच्या आवारात घडला. (Pune Crime)

 

तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नवनाथ चपाले (PSI Navnath Chapale) यांनी दिलेल्या माहितीनुसार,
फिर्यादी या भोसरी येथील लांडेवाडी मंडल कार्यालयात मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
आरोपींनी संगनमत करुन ‘तू आमच्या विरोधात निकाल का दिला. तू इथे नोकरी कशी करते तेच मी बघतो’ अशी धमकी देऊन फिर्यादी यांच्याकडे असलेले शासकीय कागदपत्रे (Government Documents) हिसकावण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर फिर्यादी या चिखली येथील यात्रा असल्याने बैलगाडा शर्यतीच्या (Bullock Cart Race) घाटाचा पंचनामा करण्यासाठी जात होत्या.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

त्यावेळी आरोपींनी त्यांची दुचाकी अडवून गाडीची चावी काढून घेतली.
तसेच रस्ता अडवून फिर्यादी करत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
आरोपी माजी नगरसेवक काळुराम पवार यांनी फिर्यादी यांना ‘तुझ्यावर अ‍ॅट्रॉसिटीची केस टाकून तुला जेल मध्ये टाकतो’
अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नवनाथ चपाले करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | FIR filed against three persons including a former NCP corporator for threatening to imprison a Mahila Mandal officer pimpri chinchwad pune

 

हे देखील वाचा :

Summer Desi Drinks | केवळ ‘हे’ 2 देशी ड्रिंक्स पिऊन शरीर ठेवा थंड आणि हेल्दी; जाणून घ्या

Central Bank Of India बँकेवर मोठे संकट ! बंद कराव्या लागतील 600 ब्रँच; तुमचे एखाद्या शाखेत खाते आहे का ?

Digital Banking In India | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! देशाच्या 75 जिल्ह्यात 75 डिजिटल बँका सुरू होणार

 

Related Posts