IMPIMP

Sanjay Raut | ‘अजित दादांनी ऐकलं नाही तर त्यांना सांगावं लागेल की, मुख्यमंत्री आज दिल्लीला गेलेत’, संजय राऊतांचा सूचक इशारा

by bali123
Sanjay Raut | Shivsena leader and MP sanjay raut enforcement directorate ed bjp in maharashtra

पिंपरी / पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (Maha Vikas Aghadi Government) आल्यानंतर सत्तेतील तिन्ही पक्षांमध्ये विसंवाद असल्याची टीका भाजपकडून (BJP) केली जात आहे. काही प्रसंगी हे मतभेद दिसून आले आहेत. त्यामुळे राज्यातील आघाडी सरकार अस्थिर असल्याचं विरोधकांकडून सातत्याने बोलले जात आहे. शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महापालिका निवडणुकीवरुन सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला (NCP) सूचक इशारा दिला आहे. अजित दादांनी (Ajit Pawar) नाही ऐकलं तर त्यांना सांगावं लागेल की मुख्यमंत्री (CM) आज दिल्लीला गेलेत, अशा शब्दात संजय राऊत (Sanjay Raut) यांनी इशारा दिला आहे. ते भोसरी येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

संजय राऊत म्हणाले, पालकमंत्री आपले नाहीत, पण राज्यात आपली सत्ता आहे. पण आपलं इथं कोणी ऐकत नाही असं म्हणतात. मुख्यमंत्री आपले आहेत, पालकमंत्री ही आपलेच आहेत. त्यांनी नाही ऐकलं तर त्यांना सांगावं लागेल, की मुख्यमंत्री दिल्लीला गेलेले आहेत आज ? पण थोडं थांबा चुकीचं लिहू नका. ते दिल्लीचा अंदाज घ्यायला गेलेत, कारण आम्हाला दिल्लीवर ही राज्य करायचं आहे. कोण कुठं बसतात ते पहतायेत, तिथं आपल्याला पोहचायचे आहे. त्याचा अंदाज घेतायेत. त्यामुळं अजित दादांशी बोलू आपण, आपल्याला एकत्र काम करायचं आहे. ते ऐकतील नाहीतर अवघड होईल, अशी मिश्किल टिप्पणी संजय राऊत यांनी केली.

 

आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर…

आघाडी होईल का, नाही झाली तर काय ? त्या भानगडीत कशाला पडायचं आपण ? आपल्याला एकट्यांन लढण्याची सवय आहे. आलात तर तुमच्याबरोबर, नाहीतर तुमच्या शिवाय. कशाकरता आपण रेंगाळत बसायचं. आपण सगळ्या जागांची तयारी केली पाहिजे. उद्या आपल्यासमोर चर्चेला बसतील. मग या घ्या, त्या घ्या. आपण सन्मानाने आघाडी करण्याचा प्रयत्न करु. पण स्वाभिमान सोडून भगव्या झेंड्याशी तडजोड आपण करणार नाही हे लक्षात घ्या. असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं.

 

आमच्या अंगावर येऊ नका…

प्रभाग चारचा होता म्हणून आपल्याला फटका बसला. पण भाजप सत्तेत का आली ? त्यांना याचा का फायदा झाला, याचा आपण विचार करयला पाहिजे. मुंबईत जर आपला बोलबाला आहे पण त्या लगतच्या पुणे (Pune) – पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) का होत नाही. ही खंत आहे. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) पुण्यात येऊन घासून आले, मग आपण ठासून येऊ. कोल्हापूरचा गडी पुण्यात आला की कोथरुडमध्ये आला आपल्याला काही फरक पडत नाही. पण आमच्या अंगावर येऊ नका, असा इशारा त्यांनी चंद्रकांत पाटलांना दिला.

 

पोलिसांची बघ्याची भूमिका

राज्यात कोरोनाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नसताना पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचा मेळावा पार पडला. शिवसेनेच्या या मेळाव्याला पोलिसांनी (Police) परवानगी नाकारली (Permission denied) होती. परवानगी नसताना शिवेसेनेचे खासदार संजय राऊत, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर (Sachin Ahir), सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर (Aditya Shirodkar) यांच्या उपस्थित हा मेळावा पार पडला.
मेळाव्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. परंतु कोरोनाचे काही निर्बंध कायम असल्याने पोलिसांनी परवानगी नाकारली होती.
मात्र हे झुगारुन शिवसेनेने हा मेळावा घेतला. एकिकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जनतेवर असलेले निर्बंध शिथिल करत नाहीत,
दुसरीकडे मात्र त्यांचेच नेते अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करुन कोरोना नियमांना हरताळ फासत आहे.
मेळाव्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. मात्र पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचे पहायला मिळालं.

Web Titel : Sanjay Raut | shiv sena mp sanjay raut pune ajit pawar pimpari chinchwad election maha vikas aghadi

Related Posts