IMPIMP

Sanjay Raut | ‘…पण माझी काय परंपरा अभ्यास करुन बोलायची नाही’ (व्हिडीओ)

by nagesh
Sanjay Raut | shivsena mp sanjay raut in pune shramik patrakar sangh

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Sanjay Raut | शिवसेना नेते (Shiv Sena) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आज (शनिवारी) पुण्यात (Pune) आले होते. येथे पुणे श्रमिक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष ज. स. करंदीकर स्मृती व्याख्यानाला कार्यक्रमावेळी राऊत हे बोलत होते. ‘व्याख्यान बोलले की भिती वाटते पण भाषण चालते अश्या शब्दात त्यांनी भाषणाला सुरुवात केली. पत्रकार संघात येऊन व्याख्यान द्यायचं म्हणजे अभ्यास करुन बोलावं लागतं. पण माझी काय परंपरा तशी अभ्यास करुन बोलायची नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

 

 

https://fb.watch/8Y-9nNn0EJ/

 

 

 

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, सोशल माध्यमातून जे पत्रकारांचं पिक आलंय त्यावरून असं वाटतंय की झक मारली इतकी वर्ष, आपण लिहायला विसरलो आहोत. माझ्यामुळं मिडीयाला काम मिळतं परिवर्तनीची ताकद वृतपत्रात आहे, असं राऊत म्हणाले. तसेच, पत्रकारांना पार्लमेंट मधील सेंट्रल हॅालमध्ये येणं केंद्र सरकारने (Central Government) बंद केलं आहे. कोविडचं निमित्त झालं पण त्यांना ते बंदच करायचंच होतं. त्यांना स्वतंत्र पद्धतीची पत्रकारिता नको आहे. दिल्लीत मंत्र्यांवरही लक्ष असतं कोण कोणत्या पत्रकाराशी बोलत असतो. या बंदीवर कोणी आवाज उठवला नसल्याचा घणाघातही राऊत यांनी केला.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पुढे बोलताना राऊत (Sanjay Raut) म्हणाले, आणिबाणीतही पत्रकारांना रोखलं नव्हतं गेले 72 तास मी पहातोय.
कोणत्याही क्षणी आर्यन खान तुरुंगाच्या बाहेर येईल, हे काल पासून सुरु आहे मी पहातोय. मन्नतवर गर्दी आहे.
मन्नत वर फटाके वाजतायत. बहुतेक त्यात शाहरुख आहे अशी पत्रकारिता सध्या सुरु असल्याचं ते म्हणाले.
24 तास सगळी माध्यमं एका प्रकरणात अडकलेल्या एका मुलाच्या मागे राहता. एरवी पेट्रोल महागाई हे विषय दिसतात.
आर्यन खान आल्यावर आर्यन खान विषयाला बातम्या म्हणायचं की मनोरंजन या देशातल्या राज्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारचा स्वतंत्र मिडीया नको आहे.

 

दरम्यान, विरोधी पक्ष सक्षम असावा वृतपत्राच्या कार्यालयावर धाडी घालण्यात आल्या.
इतर वृतपत्र त्यांच्या बाजुने उभी राहिली का? ज्यांना कोळशाचे, इतर उद्योग करायचे आहेत त्यांना देशाचे वृतपत्र, मिडीया विकत घेत आहेत.
म्हणजे मालक-मिडीया त्यांच्या ताब्यात राहतील, असा घणाघात देखील राऊत यांनी केंद्रातल्या मोदी सरकारवर केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- Sanjay Raut | shivsena mp sanjay raut in pune shramik patrakar sangh

 

हे देखील वाचा :

Bhandara Crime | दुर्देवी ! 2 चिमुकल्या बहीण-भावांचा खेळता-खेळता तलावात पडून मृत्यू

Breast Cancer | पुरुषांमध्येही ‘ब्रेस्ट कॅन्सर’ची समस्या निर्माण होऊ शकते; काय आहेत लक्षणे?, जाणून घ्या

Jalgaon Crime | एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात थांबवून अल्पवयीन मुलीशी केले अश्लील कृत्य

 

Related Posts