IMPIMP

Breast Cancer | पुरुषांमध्येही ‘ब्रेस्ट कॅन्सर’ची समस्या निर्माण होऊ शकते; काय आहेत लक्षणे?, जाणून घ्या

by nagesh
Breast Cancer | symptoms of breast cancer in men know more

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Breast Cancer | तरूणांचे दैनंदिन जीवनात मद्यपान आणि धुम्रपान यासारख्या सेवनांचा अमर्यादीत वापर केला जातो. पण हा एक शरीरासाठी धोका संभवतो. या सेवनांच्या सवयीमुळे तरुणामध्ये अलिकडेच ‘ब्रेस्ट कॅन्सर’ (Breast Cancer) म्हणजेच स्तनाच्या कर्करोगाचा धोका अधिकच वाढताना दिसत आहे. या आजाराचा परिणाम पुरूषांमध्येही होत असल्याने त्याची लक्षणेही लगेच दिसून येतात. पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण हळुवारपणे वाढत आहे. महत्वाचे म्हणजे या रोगापासून सावध राहण्यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. नाहीतर ‘ब्रेस्ट कॅन्सर’ने मृत्यु होण्याची कारणेही तितकीच वाढण्याची शक्यता आहे.

 

महिलांध्ये (Women) ‘ब्रेस्ट कॅन्सर’चे (Breast Cancer) प्रमाण मोठ्या प्रमाणात असतात.
त्याचबरोबर पुरूषामध्ये (Male) हे प्रमाण कमी असते. दरम्यान, प्रत्येक वर्षी अशी किमान 2 प्रकरणे समोर येत आहेत.
पुरुषांमध्ये, स्तनाच्या कर्करोगाच्या पेशी पुरुषांच्या स्तनाच्या ऊतीमध्ये बनतात.
तेव्हा ब्रेस्ट कॅन्सर’ होतो. सुमारे 10 वर्षांपूर्वी पुरुषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची समस्या फक्त 50-70 वर्षांच्या लोकांनाच दिसून येत होती.
मात्र, आता 40-50 वर्षांच्या वयात देखील असं घडताना दिसत आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

मागील वर्षी 140 कॅन्सरग्रस्त रुग्णांपैकी 2 रुग्ण ब्रेस्ट कॅन्सर’चे होते.
स्तनाच्या कर्करोगाच्या 100 पैकी एक प्रकरण पुरुषांशी संबंधित आहे.
तसेच, पुरुष स्तनाच्या कर्करोगाची 60-70 टक्के प्रकरणे तिसऱ्या अथवा शेवटच्या टप्प्यात लक्षात येतात.
कर्करोगाच्या पेशी स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक आक्रमकपणे पसरतात.
अशी माहिती मंगळुरू येथील केएमसी हॉस्पिटलचे डॉ. हरीश (Dr. Harish) यांनी सांगितली आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते.

 

हे आहेत लक्षणे –

 

पुरुषांच्या स्तनाच्या कर्करोगात लोक अनेकदा गाठ उठणे किंवा असल्यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात.
या लक्षणांमुळे नंतर पाठदुखी, कावीळ आणि श्वासोच्छवासाचा त्रास होतो.
पुरुषांमध्ये स्तनाचा कर्करोग अनुवांशिक कारणांमुळे होऊ शकतो.
याशिवाय गायकोमास्टियाने ग्रस्त असलेल्यांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते.

 

Web Title : Breast Cancer | symptoms of breast cancer in men know more

 

हे देखील वाचा :

Jalgaon Crime | एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात थांबवून अल्पवयीन मुलीशी केले अश्लील कृत्य

Pune Airport | 15 दिवसांनंतर पुण्याच्या लोहगाव विमानतळावरून विमानसेवा सुरू

MP Udayanraje Bhosale | ‘हात जोडून विनंती करतो, बँकेच्या सभासदांची जिरवू नका, माझी जिरवायची असेल तर जिरवा’ (व्हिडीओ)

 

Related Posts