IMPIMP

SBI Card PULSE | SBI ने तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करणार्‍यांसाठी सादर केले विशेष क्रेडिट कार्ड, जाणून घ्या वैशिष्ट्ये

by nagesh
SBI Card PULES | sbi card launches fitness focused credit card that offers welcome gift and access to gyms

नवी दिल्ली : वृत्तसंस्था SBI Card PULSE | तुम्ही आरोग्य आणि तंदुरुस्तीकडे विशेष लक्ष दिल्यास, SBI कार्डने तुमच्यासाठी खास क्रेडिट कार्ड SBI Card PULSE लाँच केले आहे. SBI Card ने म्हटले आहे की, आरोग्य आणि फिटनेसच्या बाबतीत जागरूक कार्डधारकांच्या गरजा पूर्ण केल्या जातील.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

हे कार्ड VISA प्लॅटफॉर्मवर लॉन्च करण्यात आले आहे. याचा अर्थ विजा कार्ड स्वीकारणार्‍या सर्व व्यापारी आउटलेट किंवा ऑनलाइन साईटवर कार्ड वापरले जाऊ शकते.

 

हे कॉन्टॅक्ट लेस क्रेडिट कार्ड रू. 1,499 च्या वार्षिक सदस्यता शुल्कासह येते. या कार्डद्वारे वर्षभरात 2 लाख रुपये खर्च केल्यास नूतनीकरण शुल्क माफ केले जाईल. जॉयनिंग फी भरल्यानंतर कार्डधारकांना स्वागत लाभ म्हणून ’नॉईज कलरफिट पल्स स्मार्टवॉच’ (Noise ColorFit Pulse Smartwatch) मिळते. या स्मार्टवॉचची किंमत 4,999 रुपये आहे. या स्मार्टवॉचमध्ये 1.4 इंच फुल कलर डिस्प्ले, ब्लड ऑक्सिजन मॉनिटरिंग (SPO2), स्लीप मॉनिटरिंग यांसारखी अनेक उत्तम वैशिष्ट्ये आहेत. (SBI Card PULSE )

ग्राहकांना आणखी काय मिळणार?
SBI कार्ड पल्स ग्राहकांना एक वर्षासाठी मोफत Fitpass Pro सदस्यत्व मिळते.
या अंतर्गत, ग्राहकांना देशातील 4,000 हून अधिक जिम आणि फिटनेस स्टुडिओच्या नेटवर्कमध्ये प्रवेश मिळेल.
याशिवाय कार्डधारकांना नेटमेड्स फर्स्ट (Netmeds First) ची एक वर्षाची मोफत सदस्यता देखील दिली जात आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील का?
जेव्हा ग्राहक पल्स कार्डद्वारे फार्मसी, औषध दुकाने, जेवण आणि चित्रपटांसाठी खर्च करतात तेव्हा ते 5X रिवॉर्ड पॉइंट मिळवू शकतात.
याशिवाय, एका वर्षात 4 लाख रुपये खर्च केल्यावर, कार्डधारकांना Netmeds वर 1,500 रुपयांचे ई-व्हाउचर दिले जाईल.

 

Web Title :- SBI Card PULES | sbi card launches fitness focused credit card that offers welcome gift and access to gyms

 

हे देखील वाचा :

Akshay Kumar-OMG 2 | ‘OMG 2’ च्या शूटसाठी निघाला अक्षय कुमार, फॅन्सने शिव तांडव करत केलं स्वागत (व्हिडीओ)

Modi Government Alert | मोदी सरकारचा अलर्ट ! कर्ज देणारी बनावट अ‍ॅप इन्स्टॉल करू नका आणि लिंक उघडू नका, काही क्षणात गायब होईल तुमची रक्कम

Police Inspector Transfer Pune | पुण्यातील 7 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; हडपसर, मुंढवा पोलिस ठाण्यात नियुक्ती

 

Related Posts