IMPIMP

Sharad Mohol Dead In Firing | कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर गोळीबार करणार्‍याचे नाव निष्पन्न, सोबत असलेल्यांनीच केला घातपात

by sachinsitapure
Sharad Mohol Dead In Firing

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Sharad Mohol Dead In Firing | कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर शुक्रवारी (दि.5) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोथरूड परिसरातील सुतारदर्‍यात गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये जखमी झालेल्या मोहोळचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आता त्याच्यावर गोळीबार करणार्‍याचे नाव निष्पन्न झाले आहे. शरद मोहोळसोबत असणार्‍यांनीच त्याच्यावर गोळीबार (Sharad Mohol Dead In Firing) केल्याचं पोलिसांनी सांगितले असून त्यापैकी एकाच नाव समोर आलं आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर (रा. सुतारदरा, कोथरूड) याने आणि त्याच्या इतर साथीदारांनी शरद मोहोळवर गोळीबार (Sharad Mohol Dead In Firing) केलेला आहे. मोहोळ याच्यावर त्याच्यासोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनीच गोळीबार केल्यामुळे आर्श्चय व्यक्त करण्यात येत आहे. गोळीबाराचं नेमकं कारण काय याचा तपास पोलिस करीत आहेत.

दरम्यान, मोहोळवर गोळीबार झाल्यानंतर त्याला उपचारासाठी सर्वप्रथम कोथरूड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये (Sahyadri Hospital) नेण्यात आले होते तेथून त्याला ससून हॉस्पिटलमध्ये (Sassoon Hospital) दाखल करण्यात आला. उपचारादरम्यान मोहोळला मयत घोषित करण्यात आलं आहे. दरम्यान, मोहोळच्या समर्थकांनी आणि नातेवाईकांनी ससून रूग्णालयात प्रचंड गर्दी केली होती. दरम्यान, गुन्हयात निष्पन्न झालेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आल्याची माहिती कोथरूड पोलिस ठाण्याचे (Kothrud Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Senior PI Hemant Patil) यांनी दिली आहे.

कोण होता शरद मोहोळ?

गाजलेल्या ‘मुळशी पॅटर्न’ (Mulshi Pattern) चित्रपटाने पुण्यातील आणि मुळशी खोऱ्यातील गुन्हेगारी जगताची ओळख झाली, त्याच मुळशी तालुक्यातील शरद मोहोळ होता. गुंड संदीप मोहोळचा (Gangster Sandeep Mohol) चालक म्हणून शरद मोहोळ काम करत होता. परंतु, त्याच संदीप मोहोळचा खून झाल्यानंतर तो गुन्हेगार म्हणून नावारुपाला आला. शरद याचे आई वडिल शेतकरी असून बेताच्या परिस्थिती मोठा होऊन तो गुन्हेगारीकडे वळला होता.

अनेक गंभीर गुन्हे दाखल

कुख्यात शरद मोहोळ याच्यावर खून (Murder), खूनाचा प्रयत्न (Attempted Murder), खंडणी (Extortion),
अपहरण (Kidnapping) यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पिंटू मारणे खून प्रकरणात (Pintu Marne Murder Case) त्याला अटक झाली होती.
या प्रकरणात तो जामिनावर बाहेर आला. त्यानंतर त्याने दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे अपहरण केले. या प्रकरणात त्याला पुन्हा अटक करण्यात आली. जुलै 2022 मध्ये शरद मोहोळ याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले होते.

कातिल सिद्दीकीचा येरवडा तुरुंगात खून

शरद मोहोळ हा 15 गंभीर गुन्ह्यात अडकला होता. मोहोळ आणि त्याचा म्होरक्या आलोक भालेरावला येरवडा
कारागृहातील अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते. जून 2012 मध्ये इंडियन मुजाहिद्दीनचा संशयित सदस्य आणि
दहशतवादी खटल्यातील संशयित कातील सिद्दीकी याचा येरवडा कारागृहात नाडीने गळा आवळून खून केल्याचा
आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या दोघांची जून 2019 मध्ये पुण्यातील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती.

किशोर मारणेच्या हत्येप्रकरणात जन्मठेप

जानेवारी 2010 मध्ये गुंड किशोर मारणेच्या हत्येप्रकरणात शरद मोहोळ याचे नाव होते.
दत्तवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या किशोर मारणे खून प्रकरणात न्यायालयाने त्याच्यासह सहा साथीदारांना
दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, या शिक्षेविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली.
त्यानंतर उच्च न्यायालायाने 2021 मध्ये त्या सर्वांना जामीन मंजूर केला.
किशोर मारणे हा गणेश मारणेच्या जवळचा सहकारी होता.
गुंड संदीप मोहळ याची पौड रोडवर 4 ऑक्टोबर 2006 मध्ये हत्या करण्यात आली होती.
या गुन्ह्यात गणेश मारणे मुख्य आरोपी होता. गणेशला अटक झाल्यानंतर किशोरने टोळी चालवण्यास सुरुवात केली.
मात्र, किशोरला संपवण्यात शरद मोहोळचा हात असल्याचा आरोप आहे.

समाजकारणातून राजकारणात एन्ट्री

दरम्यान, शरद मोहोळच्या पत्नी स्वाती मोहोळ (Swati Mohol) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे.
शहरातील अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये मोहोळ दाम्पत्य दिसले होते.
शरद मोहोळचा गुंडगिरीचा धंडा असूनही त्याला राजकारणाचे वेध लागले होते.
त्याने आपली प्रतिमा निर्मिती करण्यासाठी समाजिक कार्य़क्रम राबवण्यास सुरुवात केली होती.
मात्र, राजकारणात येण्यापूर्वीच त्याचा दिवसाढवळ्या गेम झाला. त्याच्यासोबत असणाऱ्यांनीच त्याचा घात केला.
लग्नाच्या वाढदिवसादिवशीच गोळ्या झाडून शरद मोहोळचा गेम केला.

Related Posts