IMPIMP

Sharad Mohol Murder Case | जमिनीच्या वादातून शरद मोहोळचा गेम; मोहोळच्या जवळच्या साथीदारांनी रचला कट, 8 जणांना अटक

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Sharad Mohol Murder Case | गँगस्टर शरद मोहोळ याचा भर रस्त्यात गोळ्या झाडून खून करणाºया साहिल पोळेकर याच्यासह त्याला मदत करणार्‍या ८ जणांना काही तासात अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
(Sharad Mohol Murder Case)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर(वय २०, रा. सुतारदरा, कोथरुड), विठ्ठल किसन गडले (वय ३४, रा. सुतारदरा, कोथरुड), अमित मारुती कानगुडे (वय २४, रा. धायरी), नामदेव महिपत कानगुडे (३५, रा. भूगाव), चंद्रकांत शाहु शेळके (वय २२, रा. जनता वसाहत, पर्वती), विनायक संतोष घवाळकर (वय २०, रा. कोथरुड), रवींद्र वसंतराव पवार (वय ४०) आणि संजय रामभाऊ उउ्डाण (वय ४५, रा. उजवी भुसारी कॉलनी, कोथरुड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Sharad Mohol Murder Case)

याबाबत अरुण धुप्रद धुमाळ (वय ३२, रा. जयभवानीनगर, कोथरुड) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शरद मोहोळ याच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने दगडुशेठ गणपती मंदिरात साथीदारांसह दर्शनाला जात असताना सुतारदरा येथे दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास मुन्ना पोळेकर हाही शरद मोहोळ याच्या बरोबर जात होता. फिर्यादी व प्रमोद साठे हे मागून जात होते. त्यावेळी पोळेकर व त्याच्या साथीदारांनी शरद मोहोळवर गोळ्या झाडल्या. प्रमोद साठे याच्यावरही गोळ्या झाडल्या. त्यात शरद मोहोळ गंभीर जखमी झाला होता. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यु झाला.

यानंतर पोळेकर व त्याचे साथीदार हे पळून गेले होते. या घटनेची माहिती मिळताच शहर गुन्हे शाखा अलर्ट झाली.
त्यांची सर्व युनिट कामाला लागली. संशयितांचा शोध घेत असताना ते कोल्हापूरच्या दिशने जात असल्याचे आढळून आले.
पुणे सातारा रोडवर किकवी ते शिरवळ दरम्यान एका स्विफ्ट गाडीतून जात असल्याचे दिसल्याने पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन ताब्यात घेतले.
आठ आरोपींकडून ३ पिस्टल, ३ मॅगझीन, ५ काडतुसे व गाडी जप्त करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त रितेशकुमार, प्रभारी सह आयुक्त आणि अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,
पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे,
सतीश गोवेकर व त्यांच्या सहकार्‍यांनी ही कामगिरी केली आहे.