IMPIMP

Sharad Pawar | भाजपचा टोला; म्हणाले – ‘त्याऐवजी शरद पवारांना पंतप्रधान करण्याचा ठराव केला असता तर..’

by nagesh
Sharad Pawar | sharad pawar comment on himachal pradesh and gujarat assembly election 2022 result

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Sharad Pawar | नुकतंच काही दिवसांपूर्नी पाच राज्यातील निवडणुकांचा निकाल लागला. त्यापैकी चार राज्यात भाजपने (BJP) सत्ता मिळवली आहे. दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी केंद्रातील भाजप सरकारविरोधात रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. अशातच काल (मंगळवारी) राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना संयुक्त पुरोगामी आघाडीचे (UPA) अध्यक्ष करावे असा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यानंतर भाजपने (BJP) राष्ट्रवादीसह शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

”राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (Nationalist Youth Congress) कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांना UPA चे अध्यक्ष करण्याचा ठराव पारित करण्यात आला. त्याऐवजी त्यांना पंतप्रधान करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असता तर देशाच्या राजकारणाला निर्णायक कलाटणी मिळाली असती. उंबरातले किडेमकोडे उंबरी करिती लीला,” असा खोचक टोला भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्विटरवरून लगावला आहे.

 

 

दरम्यान, राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकी वेळी शरद पवारही उपस्थित होते.
त्यावेळी शरद पवारांकडे यूपीएचे अध्यक्षपद सोपवण्याचा ठराव मांडण्यात आला आणि संमतही केला गेला.
दरम्यान, एकीकडे काँग्रेसच्या (Congress) नेतृत्तावरुन वादंग सुरू आहे आणि दुसरीकडे शरद पवारांकडे युपीएच्या नेतृत्वावरुन आता राजकीय वातावरण आणखी तापण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे समजते.
अशातच भाजपने जोरदार निशाणा साधला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Sharad Pawar | bjp leader atul bhatkhalkar taunt on sharad pawar to make president of upa proposal of ncp youth congress

 

हे देखील वाचा :

CM Uddhav Thackeray | रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीतच ! CM उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र

Pune Crime | पुण्यात 21 वर्षीय बॅक स्टेज आर्टिस्टवर दिग्दर्शकाचा बलात्कार; अश्लिल व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची धमकी

Petrol Diesel Price Hike Pune | पेट्रोल, डिझेलच्या दरातील भाववाढ अतिवेगवान; सलग सातव्या दिवशी दरवाढ

PMC Job Vacancy 2022 | सुशिक्षीत बेरोजगारांसाठी खुशखबर ! पुणे महापालिकेत 200 अभियंत्यांसह 500 पदांसाठी भरती

 

Related Posts