IMPIMP

PMC Job Vacancy 2022 | सुशिक्षीत बेरोजगारांसाठी खुशखबर ! पुणे महापालिकेत 200 अभियंत्यांसह 500 पदांसाठी भरती

200 अभियंत्यांसह आरोग्य आणि व्यवस्थापन विभागामध्ये कायमस्वरूपी भरती; 'अग्निशामक'मध्ये कंत्राटी भरती - आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार

by nagesh
Pune PMC News | In the upcoming clerk recruitment process, the municipal administration is trying to make the candidate's educational qualification a graduate instead of 10th pass

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन PMC Job Vacancy 2022 | पुणे महापालिकेमध्ये (Pune Corporation) पुढील दोन महिन्यांत 500 सेवकांची भरती होणार आहे. यामध्ये तब्बल 200 अभियंत्यांसह (Engineers) आरोग्य (Health Department) आणि व्यवस्थापन विभागामध्ये (Management) कायमस्वरूपी भरती केली जाणार असून अग्निशामक दलासाठी 200 जवानांची (Pune Fire Brigade) कंत्राटी भरती केली जाणार आहे. भरती प्रक्रिया (PMC Recruitment 2022) राबविण्यासाठी लवकरच नियोजन केले जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार (PMC Administrator and Commissioner Vikram Kumar) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. (PMC Job Vacancy 2022)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

पुणे महापालिकेचा आकृतीबंध मंजुर झाला असला तरी कर्मचारी भरतीबाबत प्रशासन सावध पावले उचलत आहेत. परंतू शहराच्या दैनंदीन व्यवस्थापनात आणि विकासकामांमध्ये गरज असलेल्या अभियंता वर्गाची खूपच कमतरता असून आहे त्या अभियंत्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. यासंदर्भात बोलताना विक्रम कुमार यांनी सांगितले, की अभियंत्यांची 347 पदे रिक्त आहेत. यामध्ये निवृत्त झालेले तसेच पदोन्नतीमुळे रिक्त झालेल्या पदांचाही समावेश आहे. यापैकी 200 पदे भरण्याबाबत अधिकार्‍यांच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. यासोबतच आरोग्य विभाग आणि व्यवस्थापन विभागातीलही अनेक पदे रिक्त आहेत. त्यांचीही आकडेवारी काढून त्यापैकी काही पदे भरण्याबाबतही चर्चा झाली आहे. त्यानुसार लवकरच भरती प्रक्रिया (Pune Corporation Recruitment 2022) राबविण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. मे महिन्यापर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. (PMC Job Vacancy 2022)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

महापालिकेच्या अग्निशामक दलातही अनेक पदे रिक्त आहेत. महापालिकेमध्ये 34 गावांचा समावेश केल्यानंतरही ही गरज अधिकच जाणवू लागली आहे.
उपनगरांमध्ये नव्याने अग्निशामक केंद्रही बांधण्यात आली आहेत. मात्र, मनुष्यबळाअभावी ती सुरू होउ शकलेली नाहीत.
अग्निशामक दलाकडून 200 जवानांची कंत्राटी भरती करण्यासंदर्भात प्रस्ताव आलेला आहे.
या प्रस्तावानुसारही कंत्राटी पद्धतीने ही पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच राबविण्यात येईल, अशी माहिती विक्रम कुमार यांनी दिली.

 

 

Web Title :- PMC Job Vacancy 2022 | Good news for the educated unemployed! Recruitment for 500 posts in Pune Municipal Corporation; Permanent recruitment in the health and management department with 200 engineers; Contract Recruitment in ‘Fire Brigade’ – Commissioner and Administrator Vikram Kumar

 

हे देखील वाचा :

Pune Crime | लोणावळ्यात 4 कोटींची रोकड जप्त, दोघांना अटक

IRCTC Indian Railway Rule | ट्रेनमध्ये प्रवास करताना सामान झाले असेल चोरी तर काळजी करू नका, रेल्वे देईल भरपाई!

Sanjay Dutt Viral News | संजूबाबाच्या ‘या’ हरकतीमुळं स्वत:ला थांबवू शकली नाही पत्नी मान्यता, वयाच्या 62 व्या वर्षी त्यानं ओलांडल्या सर्व मर्यादा

Pune Water Supply | प्रभात रस्ता परिसरातील 60 वर्षे जुनी ‘खापरा’ची पाईपलाईन फुटली होती; पाणी पुरवठा विभागाच्या हेल्पलाईनवर पहिल्याच दिवशी तक्रारींचा पाऊस

 

Related Posts