IMPIMP

Sharad Pawar | राजकारणात मतभेद, संघर्ष असतो परंतु टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्राची नाही; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

by nagesh
Sharad Pawar | sharad pawar the person who threatened ncp chief sharad pawar was found there is information that the accused is in out of state

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनएसटी कर्मचारी (MSRTC Employees) कारण नसताना काही महिने घरदार सोडून नोकरीच्या बाहेर राहिला आणि त्यामुळे आर्थिक संकट त्यांच्या कुटुंबावर आले. त्यासाठी आत्महत्या (MSRTC Worker Suicide) करण्याची टोकाची भूमिका त्यांना घ्यावी लागली. त्यामुळे जे नेतृत्व अतिटोकाची भूमिका घेण्याची परिस्थिती निर्माण करते तेच नेतृत्व आत्महत्या किंवा तत्सम गोष्टींना जबाबदार आहे असा थेट आरोप शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला आहे. तसेच त्याच्यातून जे काही नैराश्य आले ते नैराश्य कुठेतरी काढलं पाहिजे म्हणून याठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला. बाकी त्याच्यामध्ये दुसरं काही नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आज एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्व्हर ओक (Silver Oak) येथे आंदोलन (Agitation) केले. त्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली. आज इथे जे काही घडलं त्याबद्दल आश्चर्य व्यक्त करायचं कारण नाही. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात (Maharashtra) राजकारणात (Politics) मतभेद असतात, संघर्ष असतात पण टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्राची नाही असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. गेले काही दिवस आंदोलनाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न होत होता. तो शोभनीय नव्हता असेही शरद पवार म्हणाले.

 

एसटी कर्मचारी आणि आपले गेले 50 वर्ष घनिष्ट संबंध आहेत. त्यांचे एकही अधिवेशन माझ्याकडून चुकले नाही.
ज्या ज्यावेळी प्रश्न निर्माण झाले त्यावेळी त्यांच्या प्रश्नांना हातभार लावून सोडवण्यासाठी सहकारी लोकांनी कष्ट घेतले.
मात्र याचवेळी एक चुकीचा रस्ता दाखवला गेला आणि त्याचे दुष्परिणाम आज याठिकाणी आहेत असा टोलाही शरद पवार यांनी यावेळी लगावला.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आपण संयम पाळणारे लोकं आहोत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आपण पाठिशी आहोत
परंतु चुकीच्या नेतृत्वाच्या पाठिशी नाही हेही शरद पवार यांनी आवर्जून स्पष्ट सांगितले.
एसटी कर्मचाऱ्यांना चुकीचा रस्ता कोण दाखवत असेल तर त्या रस्त्याने विरोध करणे ही तुमची माझी जबाबदारी आहे असेही शरद पवार म्हणाले.
दरम्यान ही घटना कळल्यानंतर तात्काळ कार्यकर्ते इथे पोचले.
संकट आलं की आपण एक आहोत हेच तुम्ही दाखवून दिले त्याबद्दल शरद पवार यांनी सर्वांना धन्यवाद दिले.

 

Web Title :- Sharad Pawar | In politics, there are differences and conflicts, but Maharashtra does not have a tradition of taking a stand; Sharad Pawar’s first reaction

 

हे देखील वाचा :

Sharad Pawar | ‘नेता चुकीचा असेल तर त्याचे परिणाम काय होतात हे आज दिसलं’ – शरद पवार

Gold Silver Price Today | सोन्याच्या किमतीत किंचित घट ! चांदीच्या किमतीत वाढ; जाणून घ्या नवीन दर

Sonakshi Sinha Pregnancy Rumours | सोनाक्षी सिन्हानं शेअर केलेल्या फोटोवर नेटकरी म्हणाले – ‘तू गरोदर आहेस का?’

 

Related Posts