IMPIMP

Sharad Pawar | ‘नेता चुकीचा असेल तर त्याचे परिणाम काय होतात हे आज दिसलं’ – शरद पवार

by nagesh
Koregaon-Bhima Violence Case | NCP Chief sharad pawar will appear as a witness again in mumbai regarding the violence at koregaon bhima of pune district

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनराष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्वर ओक (Silver Oak) या बंगल्याबाहेर आज दुपारी मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी जमा (MSRTC) झाले. यावेळी आक्रमक झालेल्या आदोलनकर्त्यांनी दगडफेक व चप्पल फेक केली. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत. त्यानंतर आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (ST Employees Protest)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मी एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी, पण…
शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, मी एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे, त्यांना आधार देणं गरजेचं आहे. पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाहीये. एसटी कर्मचाऱ्यांचा मार्ग चुकत असेल तर त्यांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. राजकारणात संघर्ष (Conflict) असतात पण टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्राची (Maharashtra) नाही. गेले काही दिवस हे जे काही आंदोलनाच्या (Agitation) माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न होत होता ते शोभनीय नव्हत.

 

 

एसटी कर्मचाऱ्यांशी माझा घनिष्ठ संबंध
एसटी कर्मचारी आणि माझा घनिष्ठ संबंध आहे. गेल्या 50 वर्षापासून हे नाते आहे. त्यांचं एकही अधिवेशन माझ्याकडून सुटलं नाही. संकट आलं तर आपण सर्व एकत्र आहोत हे तुम्ही दाखवून दिलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे, असंही पवार यांनी म्हटले. तसेच टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्राची नाही. नेता चुकीचा असेल तर त्याचे परिणाम काय होतात हे आज दिसलं, असे म्हणत शरद पवार यांनी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांचे नाव न घेता हल्लाबोल केला.

 

Web Title :- Sharad Pawar | NCP Chief sharad pawar first reaction on st employees protest outside his house silver oak

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोन्याच्या किमतीत किंचित घट ! चांदीच्या किमतीत वाढ; जाणून घ्या नवीन दर

Sonakshi Sinha Pregnancy Rumours | सोनाक्षी सिन्हानं शेअर केलेल्या फोटोवर नेटकरी म्हणाले – ‘तू गरोदर आहेस का?’

Pune Municipal Corporation (PMC) | उन्हाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील उद्यानांच्या वेळेत बदल

 

Related Posts