IMPIMP

Sharad Pawar Resigns | शरद पवार निवृत्ती मागे घेणार?, समितीबद्दल दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘निर्णय मान्य…’

by nagesh
Sharad Pawar Resigns | Will Sharad Pawar withdraw his retirement?, gave his first reaction about the committee, said - 'Decision accepted...'

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन –  Sharad Pawar Resigns | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची घोषणा काल वायबी चव्हाण सेंटरमध्ये (YB Chavan Center) लोक माझे सांगाती (Lok Maze Sangati) या पुस्तक प्रकाशन सोहळयादरम्यान केली होती. राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर कुठलीही निवडणूक लढविणार नाही असेही त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. दरम्यान, नवीन अध्यक्षाच्या निवडीबाबत समिती स्थापन करण्याची सूचना शरद पवार यांनी केली होती. त्यामध्ये कोण सदस्य असावेत याबाबत देखील त्यांनी सांगितले होते. राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा मागे घेण्याचा आग्रह धरल्याने आता शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयाबाबत पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे. (Sharad Pawar Resigns)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शरद पवार म्हणतात…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना मी पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला
पाहिजे होते, असे मला आता वाटते आहे.
मात्र, जर मी हा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता तर स्वाभाविकपणे सर्वांनी मला विरोध केला असताच….आता आपण ६ मे रोजीची बैठक ५ मे रोजीच घ्या. समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल.” (Sharad Pawar Resigns)

– खासदार शरद पवार

 

 

Web Title :-  Sharad Pawar Resigns | Will Sharad Pawar withdraw his retirement?, gave his first reaction about the committee, said – ‘Decision accepted…’

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : विमाननगर पोलिस स्टेशन – व्यापार्‍यास बेदम मारहाण करून खंडणी मागणार्‍या दोघांना अटक

National Commission for Safai Karamcharis | केंद्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्यांची सफाई कामगारांच्या मुलांच्या शाळेला भेट

Jal Jeevan Mission Maharashtra | ‘जल जीवन मिशन’अंतर्गतची कामे मिशन मोडवर पूर्ण करा – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

 

Related Posts