IMPIMP

Sharad Pawar | ‘..तेव्हा नारायण राणेंचा राजीनामा घेतला का ?’; शरद पवारांचा भाजपला सवाल

by nagesh
Sharad Pawar | why not taken union minister narayan rane resign sharad pawar asks bjp

सरकारसत्ता ऑनलाइन – Sharad Pawar | राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे मनी लॉन्ड्रिंग (Money laundering)
प्रकरणामुळे ED च्या कोठडीत आहेत. मात्र यावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला (Maha Vikas Aghadi Government) धारेवर
धरलं आहे. मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत याच पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी थेट
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर निशाणा साधला.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आमचे सहकारी नारायण राणे यांनाही अटक करण्यात आली होती. त्यांना मंत्रिमंडळातून कमी करण्याचा निर्णय तुम्ही घेतला हे माझ्या पाहण्यात आलं नाही. कदाचित उद्या पंतप्रधान (PM Narendra Modi) येतील आणि याबाबत खुलासा करतील, असं शरद पवार म्हणाले. पुण्यातील वारजे माळवाडीयेथील (Warje Malwadi) एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी ओबीसी आरक्षण (OBC Reservation Maharashtra), राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवरही आपली प्रतिक्रिया दिली.

 

नवाब मलिक (Nawab Malik) यांना केलेली अटक ही राजकीय हेतूने केली गेली आहे. गेले 20 वर्ष नवाब मलिक हे विधानसभेत आहेत त्यावेळी मात्र आरोप झाले नाहीत. आताच कसे त्यांना दाऊदशी (Dawood Ibrahim) संबंध दिसत आहेत. कधी काळी माझ्यावरही आरोप करण्यात आले होते. हेच लोक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हणत पवारांनी भाजपवर निशाणा साधला. (Sharad Pawar)

 

मंत्रिमंडळात बैठक झाली त्यामध्ये काय झालं मला माहीत नाही. कायदा केला असेल नसेल मात्र तरीही ओबीसींच्या हिताचं देण्यासाठी आम्ही जे करता येईल ते करू, असं शरद पवार यांनी सांगितलं.
यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या काळातील सी. प्रकाश नावाचे राज्यपाल होते.
त्यावेळी मी कार्यकर्ता होतो नंतर पीसी अलेक्झांडर (PC Alexander) या राज्यपालांचं काम पाहिलं तर हे दोन्ही राज्यपाल कतृत्त्ववान होते.
पण आताचे राज्यपाल (Governor) यादीत कुठे दिसत नसल्याचं म्हणत पवारांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना टोला लगावला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Sharad Pawar | why not taken union minister narayan rane resign sharad pawar asks bjp

 

हे देखील वाचा :

Diabetes Management | डायबिटीज मॅनेज करण्यात टेलिकन्सल्टेशन ठरतंय खुपच उपयोगी; जाणून घ्या

Shane Warne Net Worth | Ferrari, Lamborghini सारख्या महागड्या कारने भरलेले आहे Shane Warne यांचे गॅरेज, एकुण संपत्ती ऐकून वाटेल आश्चर्य

Pomegranate Benefits | व्हायग्रा सोडा, रात्री खा एक वाटी डाळिंबाचे दाणे; ‘या’ फायद्यांनी व्हाल खुश

 

Related Posts