IMPIMP

Diabetes Management | डायबिटीज मॅनेज करण्यात टेलिकन्सल्टेशन ठरतंय खुपच उपयोगी; जाणून घ्या

by nagesh
Diabetes Management | diabetes teleconsultation significance teleconsultation is proving to be very helpful in managing diabetes

सरकारसत्ता ऑनलाइन – Diabetes Management | क्रॉनिक आजारा (Chronic’ Diseases) मध्ये समावेश असलेल्या मधुमेहाची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे, कारण यामुळे ब्लड ग्लुकोज (Blood Glucose) च्या चढ-उतारांचा मागोवा घेऊन ती नियंत्रित करता येते. चाचणी किंवा उपचारांमध्ये कोणताही विलंब मधुमेहाचा (Diabetes) धोका वाढवू शकतो. यासाठी प्रत्येक वेळी डॉक्टरकडे जाणे शक्य नसेल, तर तुमच्याकडे टेलिकन्सल्टेशन (Teleconsultation) चा पर्याय आहे, जे खूप उपयुक्त ठरत (Diabetes Management) आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

डॉ. अंबरीश मित्तल, चेअरमन आणि हेड – एंडोक्राइनोलॉजी आणि डायबेटोलॉजी, मॅक्स हेल्थकेअर (Dr. Ambrish Mithal, Chairman and Head – Endocrinology & Diabetology, Max Healthcare) म्हणतात, गेल्या वर्षी टेलीकन्सल्टेशनमध्ये 500% वाढ झाली आहे आणि डायबिटीज केअरमध्ये (Diabetes Care) टेलिकॉन्सल्टेशन रुग्णांना सक्षम करत आहे. 2020 मध्ये सुमारे 44% टेलिकन्सल्टेशन नॉन-मेट्रो शहरांमधून होते, जे दर्शविते की टेलिकन्सल्टेशनमध्ये वाढ होण्याची प्रचंड क्षमता आहे.

 

डॉ. मित्तल म्हणतात, गेल्या 2 वर्षांपासून सर्व 80% टेलीमेडिसिन वापरकर्त्यांनी याचा अनुभव घेतला आहे. महामारीमुळे देशभरात डिजिटलचा (Digital) झपाट्याने अवलंब केल्यामुळे, टेलिकन्सल्टेशन क्षेत्रात भरपूर वाव आहे. तंत्रज्ञानाने लोकांना त्यांचा मधुमेह नियंत्रित करण्याचा आत्मविश्वास दिला आहे. ते डॉक्टरांसह काळजीपूर्वक निर्णय (Diabetes Management) घेत आहेत.

 

मॉनिटरिंग टूल्सची उपलब्धता (Device Availability Monitoring)
यूजर्ससाठी ग्लुकोजवर मॉनिटरिंग (Glucose Monitoring) करणारे असे डिव्हाईस डिझाईन आहेत ज्याद्वारे ते ग्लुकोज रिडिंग (Glucose Reading) जास्त सहजपणे आणि वारंवार तपासतील. फ्री स्टाईल लिब्रे (Freestyle Libre) सारखी सतत ग्लुकोज मॉनिटरिंग करणारी उपकरणे लोकांना त्यांच्या रक्तातील ग्लुकोजच्या पातळीचे निरीक्षण करण्यास आणि इच्छित ग्लायसेमिक रेंजमध्ये (Glycemic Range) घालवलेल्या वेळेची गणना करण्यास मदत करतात.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ही उपकरणे यूजर्सला केवळ ग्लुकोजचे तात्काळ परिणाम दाखवत नाहीत तर ग्लुकोजची पातळी (Glucose Level) कुठे वाढत आहे हे देखील दाखवते.

 

देखभालीशी रुग्णांना संलग्न ठेवणे (Connecting Care for Patients)
मधुमेहाच्या देखभालीत टेलिकन्सल्टेशन रुग्णांना दिवसेंदिवस सक्षम बनवत आहे. आता रुग्ण आरोग्य, संबंधित उपकरणे आणि कार्यक्रमांबाबत अधिक जागरूक झाले आहेत.

 

डॉ. अंबरीश मित्तल पुढे म्हणाले, ग्लूकोज मॉनिटरिंग डिव्हाईस वापरकर्त्यांना रिअल टाइममध्ये डॉक्टरांसोबत ग्लुकोज डेटा (Glucose Data) आपोआप शेयर करण्यास परवानगी देतो, ज्यामुळे रुग्ण आणि डॉक्टरांना अधिक माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होईल. यामुळे रुग्णांना या रिडिंगवर आधारित आहार, शारीरिक क्रिया आणि औषधे यावर निर्णय घेण्यास मदत होईल.

 

टेलिकन्सल्टेशनमध्ये देशातील मधुमेह सेवेतील सध्याची पोकळी भरून काढण्याची क्षमता आहे.
देशाच्या दुर्गम भागात राहणार्‍या लोकांना डायबिटीज सेवेत प्रवेश मिळाल्याने ते उत्तम डॉक्टरांच्या सेवा आणि दर्जेदार देखभाल घेऊ शकतात.
हा फायदा साथीच्या रोगानंतरही दीर्घकाळ राहील

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes Management | diabetes teleconsultation significance teleconsultation is proving to be very helpful in managing diabetes

 

हे देखील वाचा :

Shane Warne Net Worth | Ferrari, Lamborghini सारख्या महागड्या कारने भरलेले आहे Shane Warne यांचे गॅरेज, एकुण संपत्ती ऐकून वाटेल आश्चर्य

Pomegranate Benefits | व्हायग्रा सोडा, रात्री खा एक वाटी डाळिंबाचे दाणे; ‘या’ फायद्यांनी व्हाल खुश

Nandurbar Crime | अपघाताचा बनाव फसला अन् खुनाचं गुढ उकललं, नंदुरबार पोलिसांच्या एलसीबीची कामगिरी

 

Related Posts