IMPIMP

Shinde Government | शिंदे गटाला झटका! सुप्रीम कोर्टाच्या ‘या’ निर्णयामुळे आमदाराची उडणार दांडी

by nagesh
CM Eknath Shinde | i am balasaheb thackeray s shiv sainik one battle won we will win again eknath shinde spacial maharashtra bmc elections

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन Shinde Government | एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शिवसेनेत (Shivsena) मोठे बंड केले. शिवसेनेतील तब्बल 40 आणि अपक्ष 10 आमदारांसह (MLA) 12 खासदार (MP) शिंदे गटात सहभागी झाले. अद्यापही शिंदे गटात (Shinde Group) मोठ्या प्रमाणात इन्कमिंग (Shinde Government) सुरु आहे. याच दरम्यान शिंदे गटातील आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे (MLA Latatai Chandrakant Sonwane) यांची आमदारकी धोक्यात आली आहे. जात प्रमाणपत्र प्रकरणी (Caste Certificate Case) जात पडताळणी समितीने (Caste Verification Committee) दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) नकार दिला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सोनवणे यांनी 2019 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर चोपडा विधानसभा मतदारसंघातून (Chopda Assembly Constituency) अनुसूचित जमातीच्या आरक्षित जागेवरून निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्यांनी जगदीश वळवी (Jagdish Vaalvi) यांचा पराभव केला होता. पराभूत उमेदवार जगदीश वळवी यांनी सोनवणे यांच्या विरोधात अर्ज दाखल केला होता. यातून जात पडताळणी समितीने लताताई सोनवणे यांचे टोकरे कोळी जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय दिला. या निर्णयाविरुद्ध सोनवणे यांनी उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली. मात्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली.

 

यानंतर सोनवणे यांनी पुन्हा एकदा खंडपीठात दाद मागितली परंतु त्यांना दिलासा मिळाला नाही. यामुळे त्यांनी सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. लताताई सोनवणे यांच्या याचिकेवर न्यायमूर्ति के. एम. जोसेफ (Justice K. M. Joseph) आणि न्यायमूर्ति ऋषिकेश रॉय (Justice Rishikesh Roy) यांच्यासमोर आज कामकाज झाले. यात न्यायालयाने त्यांच्या मागणीनुसार जात पडताळणी समितीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला. यामुळे सोनवणे यांची आमदारकी धोक्यात आली आहे. आता त्या पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात पुनर्विलोकन याचिका (Revision Petition) दाखल करु शकतात. आता सोनवणे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर लताताई सोनवणे यांनी शिंदे गटात (Shinde Government) प्रवेश केला.
मात्र आता त्या अपात्र झाल्याने शिंदे गटाचे संख्याबळ एकने कमी होणार आहे.
यामुळे सोनवणे यांच्या आगामी हालचालीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Shinde Government | jalgaon mla lata sonawanes caste certificate cancelled supreme court order

 

हे देखील वाचा :

Supreme Court | सरकारसाठी धडा आहे SC चा निर्णय ! 2 वर्षापासून जेलमध्ये बंद असलेल्या पत्रकाराला सोडताना काय-काय म्हटले, जाणून घ्या

Governor Appointed MLA | राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवरुन मविआ आणि शिंदे सरकारमध्ये राडा, वाद पोहोचला उच्च न्यायालयात

Yashoda Teaser | प्रेग्नंट झाली समंथा रुथ प्रभु ! ‘यशोदा’ बनून आपल्या बाळाला वाचवण्यासाठी लढतेय

 

Related Posts